Join us

मराठमोळ्या नऊवारीत खुललं मणिकर्णिकाचं सौंदर्य, कंगणाने परिधान केला २० किलो वजनाचा पोशाख

By ऑनलाइन लोकमत | Published: January 06, 2019 6:00 AM

१० किलोपेक्षा जास्त वजनदार नऊवारी साडी परिधान केली आहे. नऊवारीसह बारावारी आणि पैठणी साडीतही कंगणा दिसणार आहे. राजघराण्यातील महिला साडीवर नेहमी शाल शेला घ्यायच्या. त्यामुळे कंगणाने यांत शेलाचा वापर केला आहे.

बॉलीवुडची क्वीन अभिनेत्री कंगणा राणौतने विविध सिनेमांमध्ये दर्जेदार भूमिका साकारत रसिकांची मने जिंकली आहेत. कंगणाच्या प्रत्येक सिनेमाची आणि भूमिकेची रसिकांमध्ये उत्सुकता असते. आता रसिकांना कंगणाच्या बहुप्रतिक्षित मणिकर्णिका सिनेमाची उत्सुकता लागली आहे. या सिनेमात कंगणा झाशीची राणी लक्ष्मीबाई यांची भूमिका साकारणार आहे. या सिनेमातील कंगणाचा लूक साऱ्यांच्या पसंतीस पात्र ठरत आहे. कंगणा यांत पारंपरिक अंदाजात दिसणार आहे. तिने मराठमोळ्या पद्धतीने साडी आणि दागदागिने परिधान केले आहेत. योद्धा म्हणून कंगणा झळकणार आहे आणि तिचा हा लूक साजेसा वाटावा यासाठी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ड्रेस डिझायनर नीता लुल्ला यांनी विशेष मेहनत घेतली आहे. 

कंगणासाठी त्यांनी चार लूक डिझाइन केले होते. वेगवेगळ्या रंगांचा वापर करून कंगणाचा लूक साकारण्यात आला आहे. 'मणिकर्णिका' लग्नाच्या आधी विविध रंगांच्या पोशाखात दिसेल. लग्नानंतर तिचा लूक थोडा भडक करण्यात आला आहे. यात केशरी आणि लाल रंगाचा वापर केला आहे. तिसरा लूक म्हणजे ती आईच्या रूपात दिसणार आहे. त्यामुळे कमी रंगाचा वापर नीता यांनी केला. शेवटच्या आणि चौथ्या लूकमध्ये कंगणाला गडद रंगाच्या साडीत दाखवले आहे. कारण हा लूक तिच्या राणी होण्याचा लूक आहे. यात ती नऊवारी साडीत दिसणार आहे.

१० किलोपेक्षा जास्त वजनदार नऊवारी साडी परिधान केली आहे. नऊवारीसह बारावारी आणि पैठणी साडीतही कंगणा दिसणार आहे. राजघराण्यातील महिला साडीवर नेहमी शाल शेला घ्यायच्या. त्यामुळे कंगणाने यांत शेलाचा वापर केला आहे. यासोबतच २० किलोपेक्षा जास्त वजनदार राजेशाही दागिने परिधान केलेला कंगणाचा लग्नानंतरचा लूक असेल. हे दागिने महाराष्ट्रीयन पद्धतीचे असून त्याचंही वजन १० किलो आहे. याशिवाय ४ ते ५ केसाच्या अॅक्सेसरीज कंगणाने लावल्या आहेत. याचं वजन मिळून २० किलो दागिने कंगणाने परिधान केले आहेत. 

टॅग्स :कंगना राणौतमाणिकर्णिका : द क्वीन ऑफ झांसी