Join us

Memes: सोनम कपूरला कनिका कपूरचा पुळका, लोकांनी असा घेतला क्लास...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2020 10:46 IST

Memes: लोकांनी केले ट्रोल

ठळक मुद्देज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हेही कनिकाचे समर्थन करताना दिसले.

बॉलिवूड सिंगर कनिका कपूर कोरोना पॉझिटीव्ह आढळल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड इंडस्ट्रीत खळबळ माजली आहे. कनिकाने ती पॉझिटीव्ह असल्याची बातमी शेअर केली आणि एक नवा वाद उभा झाला. कनिकाच्या खुलाशानंतर काही लोक तिच्या बाजूने उभे झालेत तर काहींनी तिच्या विरोधात भूमिका घेतली. विरोध करणा-यापैंकी एक म्हणजे गायिका सोना मोहपात्रा हिने कनिकाला चांगलेच फैलावर घेतले. कनिका बेजबाबदार असल्याचा आरोप तिने ट्विट करून केला.

एकीकडे सोना मोहपात्राने कनिकाला असे फैलावर घेतले असताना अभिनेत्री सोनम कपूर मात्र कनिकाच्या बाजूने मैदानात उतरली. ‘तुम्ही सगळे कंनिकावर आरोप लावणे बंद करा. ती 9 मार्चला भारतात परतली़ तेव्हा भारत सेल्फ आयसोलेशनवर नव्हता. तर लोक होळी खेळत होते. कनिकाविरोधात बोलणे बंद करा,’असे सोनम म्हणाली. ज्येष्ठ अभिनेते ऋषी कपूर हेही कनिकाचे समर्थन करताना दिसले.

 ‘सध्या काही ‘कपूर’ लोकांसाठी वेळ अवघड आहे. भीती वाटते़ हे देवा दुस-या कपूर्सची रक्षा कर. कुठलेही चुकीचे काम न होवो,’ असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिले.

लोकांनी केले ट्रोलसोनम कपूर व ऋषी कपूर यांनी कनिका कपूरची बाजू घेतल्याने नेटक-यांनी दोघांनाही चांगलेच झोडपून काढले. सोनम कपूरला तर नेटक-यांनी चांगलेच ट्रोल केले. तिच्यावर एकापाठोपाठ एक मजेदार मीम्स बनणे सुरु झाले़. ‘प्लीज, जा आणि कनिकाला ळेट आणि मला तिच्याबद्दल कळव,’ असे एका युजरने लिहिले.पाहा तर असेच काही फनी मीम्स...

 

टॅग्स :सोनम कपूरकनिका कपूर