नवी दिल्ली - कन्नड अभिनेत्री आणि माजी लोकसभा खासदार दिव्या स्पंदना या आत्महत्या करण्याच्या विचारात होत्या. मानसिक तणावातून दिव्या स्पंदना जात असताना त्यांना सपोर्ट देण्याचं काम काँग्रेसचे माजी खासदार राहुल गांधी यांनी केले. कन्नडच्या एका टॉक शोमध्ये दिव्या स्पंदनाने हा खुलासा केला आहे. वडिलांच्या मृत्यूमुळे दिव्या स्पंदना मनातून खचली होती असं तिने सांगितले.
दिव्या स्पंदना म्हणाल्या की, वडिलांच्या निधनानंतर मी २ आठवड्यांनी संसदेत पोहचली. मी त्याठिकाणी कुणालाच ओळखत नव्हती. इतकेच संसदेचे कामकाज कसे चालते याचीही माहिती मला नव्हती. दु:ख विसरण्यासाठी मी कामात व्यस्त व्हायला लागले. हळूहळू सर्वकाही शिकले. लोकांनी मला पाठबळ दिले असं तिने सांगितले. दिव्या स्पंदना ही काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमची हेड होती.
तसेच माझ्या मनात नकारात्मक भावना येत होती. आत्महत्येचा विचार येत होता. जेव्हा माझ्या वडिलांचे निधन झाले तेव्हा मला राहुल गांधी यांनी मानसिक धीर दिला. माझ्या आईचा माझ्या जीवनावर खूप प्रभाव आहे. तिच्यानंतर वडील आणि आता राहुल गांधी. जेव्हा आत्महत्येचा विचार करत होती. तेव्हा निवडणूकही हरले होते. राहुल गांधींनी मला मदत केली आणि मानसिक पाठबळ दिले असंही दिव्या स्पंदना यांनी सांगितले.
दिव्या स्पंदनाने २०१२ साली यूथ काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१३ मध्ये कर्नाटकच्या मांड्या लोकसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक लढवली आणि जिंकलही. मागील काही वर्षात दिव्याने पुन्हा चित्रपट क्षेत्रात उतरण्याचे ठरवले. सध्या तिने स्वत:चं प्रोडक्शन हाऊस सुरू केले आहे.
कोण आहे दिव्या स्पंदना?दिव्या स्पंदना ही कन्नड अभिनेत्री आणि राजकारणी आहे. सिनेमा जगतात २००३ मध्ये कन्नड अभिनेता पुनित राजकुमार यांच्यासोबत अभि सिनेमातून त्यांनी पर्दापण केले. तामिळ, तेलुगु भाषेत त्यांनी सिनेमे बनवले. २०१४ च्या निवडणुकीत दिव्या स्पंदना अत्यंत कमी मताधिक्याने पराभूत झाली. २०१७ मध्ये दिव्या स्पंदनाला काँग्रेसच्या सोशल मीडिया टीमचे हेड बनवले.