Kapil Sharma And Ginni Chatrath Wedding : लग्नविधी सुरु,गिन्नीच्या घरी ‘अखंड पाठ’! पाहा फोटो!!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 4, 2018 11:34 AM2018-12-04T11:34:47+5:302018-12-04T11:35:58+5:30
रणवीर- दीपिका आणि प्रियांका-निकनंतर आता कपिल शर्मा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. होय, येत्या १२ डिसेंबरला कॉमेडियन कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत.
रणवीर- दीपिका आणि प्रियांका-निकनंतर आता कपिल शर्मा लग्नाच्या बोहल्यावर चढणार आहे. होय, येत्या १२ डिसेंबरला कॉमेडियन कपिल शर्मा त्याची गर्लफ्रेन्ड गिन्नी चतरथसोबत लग्नगाठ बांधणार आहे. या लग्नाचे विधी सुरू झाले आहेत. होय, लग्नाच्या आठ दिवसांपूर्वी गिन्नीच्या घरी ‘अखंड पाठ’ करण्यात आला. याचे फोटो समोर आले आहेत.
‘अखंड पाठ’दरम्यान गिन्नी पर्पल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसली. यावेळी ती आपल्या कुटुंबासोबत दिसली. एका फोटोत वडिल तिला प्रेमाने जवळ घेत, आशीर्वाद देत असल्याचेही दिसले.
कपिल व गिन्नी अमृतसर येथे लग्न करणार आहेत.
१० तारखेला कपिलच्या बहिणीच्या घरी ‘माता का जागरण’ आहे. यानंतर दुस-यादिवशी संगीत आणि यानंतर मेहंदी होणार आहे. १२ डिसेंबरला कपिल बोहल्यावर चढेल. या लग्नासाठी एक फाईव्ह स्टार हॉटेल बुक करण्यात आल्याचेही कळतेय. १४ डिसेंबरला अमृतसर येथील पंचतारांकित हॉटेलात कपिलचे ग्रॅण्ड रिसेप्शन होणार आहे. बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीतील मित्रांसाठी २४ तारखेला मुंबईत दुसरे रिसेप्शन ठेवण्यात आले आहे.
गतवर्षी मार्चमध्ये ‘मिट माय वाईफ’अशी पोस्ट टाकून कपिलने गिन्नीसोबतचे रिलेशन जगजाहिर केले होते. यानंतर कपिल व सुनील ग्रोव्हर यांच्या भांडणाचा एक अंग गाजला होता. याचदरम्यान मध्यंतरी कपिल आणि गिन्नीच्या ब्रेकअपची बातमीही आली होती. पण कालांतराने ही बातमी अफवा असल्याचे सिद्ध झाले होते.
गिन्नी आणि कपिल शर्मा दोघेही एकाच कॉलेजमध्ये शिकत होते. तिथेच दोघांची ओळख झाली आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. गिन्नीसह कपिलने ‘हस बलिय’ या शोमध्येही एकत्र कामही केले आहे. कॉलेजमध्ये असताना गिन्नीच्या नाटकांच्या प्रयोगांमध्येही तो तिची खूप मदत करायचा.
गत वर्षभरात कपिलच्या आयुष्यात प्रचंड उलथापालथ झाली. तो अनेक वादांत सापडला. डिप्रेशन, व्यसन आदींमध्ये गुरफटला. पण आता तो या सगळ्यांतून बाहेर पडला आहे. लवकरच कपिल छोट्या पडद्यावर परतणार आहे.