‘द कपिल शर्मा शो’मध्ये बच्चा यादवचे पात्र साकारणारा किकू शारदा सध्या एका वादात अडकला आहे. होय, किकू शारदासह सहा लोकांवर फसवणुकीच्या आरोपाखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे.आर्ट डायरेक्टर नितीन कुलकर्णी यांनी अंबोली पोलिस ठाण्यात सहा लोकांविरोधात एफआयआर दाखल केला. हे लोक मुंबई फेस्ट नामक एका चॅरिटेबल ट्रस्टशी संबधित आहेत. या सर्वांनी 50.70 लाख रूपयांनी फसवणुक केल्याचा नितीन कुलकर्णी यांचा आरोप आहे. नितीन कुलकर्णी यांना गतवर्षी तीन दिवसांच्या एका इव्हेंटसाठी स्टेज डिझाईन करण्याचे काम सोपवण्यात आले होते. या कामाच्या मोबदल्यात त्यांना चेक दिला गेला. पण हा चेक बाऊन्स झाला. दरम्यान किकू शारदाने स्वत:वरचे सगळे आरोप फेटाळून लावले आहेत.
माझे देणेघेणे नाहीसंबंधित चॅरिटेबल ट्रस्टशी माझा काहीही संबंध नाही. अन्य सेलिब्रिटींप्रमाणे मी या इव्हेंटला हजर होतो. मुंबई फेस्टचा मी सदस्यही नाही.गतवर्षी इव्हेंट आयोजित केला गेला होता. यात माझे वडील ट्रस्टी म्हणून सामिल झाला होता. या ट्रस्टचे एकूण 5 ट्रस्टी आहेत. माझा याच्याशी दुरान्वयाने संबंध नाही. मी केवळ एका ट्रस्टीचा मुलगा आहे. माझे वडिल माझ्या नावाचा वापर करून हा इव्हेंट यशस्वी करू इच्छित होते. माझ्या वडिलांनी मला सांगितल्यानुसार, संबंधित व्यक्तिने दिलेल्या शब्दानुसार काम केले नाही. याऊपर तो अतिरिक्त पैशांची मागणी करत होता. त्यामुळे त्यांनी त्याला पैसे देण्यास नकार दिला, असे किकू शारदाने सांगितले.