बॉलिवूडच्या हँडसम हिरोंची यादी बनवलीच तर धर्मेन्द्र यांच्यानंतर हृतिक रोशन याचेच नाव येईल. एकेकाळी तरूणाई धर्मेन्द्र यांच्या स्टाईलवर फिदा होती. त्यानंतर हृतिकनेही तरूणाईला असेच वेड लावले. त्याचा डान्स असो वा लूक्स दोन्हींवर तरूणाई फिदा झाली.हृतिक रोशनने ‘कहो ना प्यार है’ मधून डेब्यू केला आणि सगळेच त्याच्या प्रेमात पडले. तरूणींना तर हृतिकने अक्षरश: वेड लावले. त्याचमुळे ‘कहो ना प्यार है’ रिलीज झाल्यावर हृतिकला 30 हजार लग्नाचे प्रस्ताव मिळाले होते. होय, नुकताच ‘द कपिल शर्मा शो’मध्ये खुद्द हृतिकने हा खुलासा केला.
टायगर आपल्या गुरूच्याच विरोधात का जातो आणि या वॉरचा शेवट काय होतो, हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. गांधी जयंतीच्या मुहुर्तावर अर्थात 2 ऑक्टोबरला हा सिनेमा देशभरात प्रदर्शित होणार आहे. सिद्धार्थ आनंदने या सिनेमाचे दिग्दर्शन केले असून आदित्य चोप्राने सिनेमाची निर्मिती केली आहे.