ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 13 - सोनी टीव्हीवरील लोकप्रिय "द कपिल शर्मा शो"वर सध्या संकटाचं वादळ घोंगावत आहे. काही दिवसांपासून कॉमेडी किंग कपिल शर्मा आणि सुनिल ग्रोव्हर यांच्यातील वाद वाढतच आहे. दोघांच्या मैत्रीत आलेल्या दुराव्याचा फटका बसून शो बंद पडण्याची शक्यता आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आता कपिलचे जुने साथीदार अली असगर, सुगंधा मिश्रा आणि संकेत भोसलेसह शोची क्रिएटिव्ह डायरेक्टर प्रीति सिमोसने कृष्णा अभिषेकसोबत हात मिळवणी केली आहे. तर सगळ्या गोष्टी जुळून आल्यास सुनील ग्रोवरही या शोमध्ये दिसेल. लवकरच ही टीम सोनी टिव्हीवरच नवीन शो घेऊन येत आहे.टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार या शोचे नाव कॉमेडी कंपनी आहे. या शो चे सुत्रसंचालन कृष्णा करणार आहे. मात्र याबाबत कृष्णाकडून कोणतीही प्रतिक्रीया आलेली नाही. सलमान खानच्या दस का दम शो येईपर्यंतच कपिल शर्माचा शो सुरु राहणार आहे. त्यानंतर हा कार्यक्रम बंद करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले आहे. 2008 आणि 2009 मध्ये सलमानने दस का दम रियालिटी शोचे दोन सिझन टेलिकास्ट झाले आहेत.
आणखी वाचा : "द कपिल शर्मा शो"ला रिप्लेस करणार सलमान खान ?
मेलबर्नहून मुंबईमध्ये परतत असताना सुनिलशी झालेला वाद आणि त्यानंतर आलेली आयपीएल स्पर्धा यामुळे कपिलच्या शोचा टीआरपी चागंलाच घसरला होता. पण आता आयपीएल संपले आहे. त्यामुळे कपिलला आपला टीआरपी सुधारण्यास मदत होईल. हाफ गर्लफ्रेंडच्या प्रमोशनसाठी आलेल्या अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर या एपिसोडला टीआरपी वाढला होता. या भागाला चांगलीच पसंती दर्शवली होती. बीएआरसीच्या ताज्या अहवालानुसार पुन्हा एकदा त्याचा शो टीआरपी रेटींगमध्ये टॉप 10 मध्ये आला आहे. शोने पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. याआधी हा शो १४ व्या स्थानापर्यंत घसरला होता.
आणखी वाचा : कपिल शर्माला दिलासा, हा फेमस चेहरा शोमध्ये परतणार
: द कपिल शर्मा शो"मुळे नवज्योतसिंग सिद्धू अडचणीत