हिंदी चित्रपटसृष्टीत दिग्गज कलाकारांची मुलं आणि मुली आपल्या आई-वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत सिनेमात आपलं नशीब आजमावतात. गेल्या अनेक वर्षांपासून चित्रपटसृष्टीत ही परंपरा सुरु आहे. आपल्या घरात सुरु असलेला अभिनयाचा वारसा दिग्गज कलाकारांची मुलं मुली पुढे नेत असतात. सध्या बॉलीवुडमध्ये अनेक दिग्गज कलाकारांची मुलं-मुली सिनेमात एंट्री मारणार असल्याच्या चर्चा रंगल्या आहेत. यांत अभिनेता संजय कपूरची लेक शनाया कपूरला धर्मा प्रॉडक्शन लॉन्च करणार असल्याचे जाहीर केले आहे. शनायालाच नाही तर अनेकांसाठी करण जोहरने पुढाकार घेत इंडस्ट्रीत लॉन्च केले आहे.टाकुयात यावर एक नजर.
आलिया भट्टने २०१२ मध्ये 'स्टुडंट ऑफ द ईयर' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात तिच्यासोबत वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा देखील होता. आलिया भट्टच्या पहिल्या चित्रपटाला समीक्षक आणि प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. आलियानेही मिळालेल्या संधीचे सोनं करत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.
करण जोहरच्या ‘माय नेम इज खान’ या चित्रपटात वरुण धवनने सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. यानंतर २०१२ मध्ये रिलीज झालेल्या 'स्टुडंट ऑफ द इयर' चित्रपटातून त्याने अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. वरुण धवनने 'बदलापूर', 'एबीसीडी' 2, 'दिलवाले' यांसारख्या हिट चित्रपटात काम केले आहे.
अनन्या पांडेने करण जोहरच्या 'स्टुडंट ऑफ द ईयर 2' या चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. या चित्रपटात तारा सुतारिया आणि टायगर श्रॉफ यांनी देखील काम केले होते. तारा सुतारियाने देखील हा चित्रपटाद्वारे डेब्यू केला होता. चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता.
अनन्या पांडे आतापर्यंत 'पति पत्नी और वो' आणि 'खाली पीली'मध्ये झळकली आहे. आता ती 'लाइगर' आणि शकुन बत्राच्या चित्रपटात काम करताना दिसणार आहे.
बोनी कपूर आणि श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूरने करण जोहरच्या 'धडक' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. या चित्रपटात ईशान खट्टरही झळकला होता. 'सैराट' या सुपरहिट चित्रपटाचा 'धडक' रिमेक होता. ईशान खट्टर आणि जान्हवी कपूरची केमिस्ट्री रसिकांच्या पसंतीस पात्र ठरली होती. जान्हवी नुकतीच 'गुंजन सक्सेना - द कारगिल गर्ल' आणि 'रुही' चित्रपटामध्ये झळकली आहे. आगामी काळात 'दोस्ताना 2' आणि 'गुड लक जेरी' मध्ये दिसणार आहे.