करण जोहर झाला 'सैराट', विकत घेतले रिमेकचे हक्क!

By Admin | Published: November 14, 2016 02:21 PM2016-11-14T14:21:55+5:302016-11-14T15:02:11+5:30

बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरलाही सैराटने भुरळ पाडली असून, त्याने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतल्याचे वृत्त आहे.

Karan Johar became a 'sarat', bought remake rights! | करण जोहर झाला 'सैराट', विकत घेतले रिमेकचे हक्क!

करण जोहर झाला 'सैराट', विकत घेतले रिमेकचे हक्क!

googlenewsNext
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १४ - प्रभावी मांडणी, कर्णमधुर संगीत, फ्रेश कास्टिंग या सर्व गोष्टींचा उत्तम मेळ साधत मराठी चित्रपटाच्या इतिहासात प्रथमच १०० कोटींची कमाई करणाऱ्या नागराज मंजुळे दिग्दर्शित आर्ची -परशाच्या 'सैराट'ने सर्वांनाच याड लावलं. मराठी चित्रपटसृष्टीसह आमिर खान, रितेश देशमुख, वरूण धवन सारख्या स्टार्सनाही वेड लावणाऱ्या या चित्रपटाने एक नाव इतिहास रचला. बॉलीवूडचा आघाडीचा दिग्दर्शक करण जोहरलाही चित्रपटाने भुरळ पाडली असून, त्याने या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क विकत घेतल्याचे वृत्त आहे. 
 सैराट सुपरडुपर हिट झाल्यानंतर या चित्रपटाच्या रिमेकचे हक्क मिळवण्यासाठी बॉलीवुडमधील अनेक निर्माते उत्सुक होते. मात्र अखेरीस करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनने बाजी मारत हे हक्क मिळवले. आता धर्मा प्रॉडक्शन आणि झी आता एकत्रितपणे या चित्रपटाची हिंदी भाषेत निर्मिती करणार आहेत.
(आर्ची पुन्हा होणरा सैराट)
 या चित्रपटाचे कथानक बऱ्यापैकी सैराटसारखेर राहणार आहे. मात्र संपूर्ण भारतातील प्रेक्षक वर्गाला विचारात घेऊन त्यात थोडेफार बदल करण्यात येतील. चित्रपटात नव्या कलाकारांना संधी देण्यात येणार असून, पुढील वर्षी त्याच्या चित्रिकरणास सुरुवात होऊ शकते. 
( आता देशी दारूही होणार 'सैराट' आणि 'झिंगाट')

Web Title: Karan Johar became a 'sarat', bought remake rights!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.