Join us

Karan Johar Birthday: करीनाचा 'स्वीट हार्ट', आलियाचे 'वडील'; करण जोहरला अभिनेत्रींनी दिल्या वाढदिवसाच्या हटके शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2022 4:47 PM

Karan Johar : चित्रपट निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आज ५०वा वाढदिवस साजरा करत आहे. अनेक सेलिब्रिटींनी त्याला सोशल मीडियावर टॅग करून शुभेच्छा दिल्या आहेत.

बॉलिवूडचा प्रसिद्ध निर्माता-दिग्दर्शक करण जोहर(Karan Johar)चा आज ५० वा वाढदिवस आहे. सोशल मीडियावर चाहते त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. तसेच त्याला सिनेइंडस्ट्रीतील मित्र मैत्रिणींनीदेखील हटके अंदाजात करण जोहरला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यात करीना कपूर आणि आलिया भटचा समावेश आहे. 

करण जोहरची गॉसिप पार्टनर करीना कपूरने त्याच्या वाढदिवसानिमित्त स्पेशल पोस्ट शेअर केली आहे. तिने करण जोहरसोबत फोटो शेअर करत लिहिले की, मला माहित नाही की आपण पाउट करतो आहे का? आपल्या गालावर suck करतो आहे. मात्र काहीही असो हे तर आपणच आहोत. तू आणि मी. तू आणि मी नेहमीच एकत्र राहणार...प्रेमाचे नाते...चल, आज रात्री असा डान्स करुयात जसा आजपर्यंत केला नाही. कारण आज माझा स्वीटहार्टचा वाढदिवस आहे. हॅप्पी ५० करण जोहर. तुझ्यासारखे दुसरे कोणी नाही.

त्याचवेळी फराह खानने एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये ती तिच्या वॉर्डरोबचा व्हिडिओ बनवत आहे आणि करण जोहरसोबत बोलत आहे. या व्हिडिओमध्ये फराहने करणला बूट आणि कपड्यांचा ढीग दाखवला आणि ओ माय गॉड बोलताना ऐकले. तरीही फराह तिच्या बेजबाबदार शैलीसाठी ओळखली जाते, तिने व्हिडिओमध्येच करणला विचारले की त्याला कोठडीतून बाहेर यायचे आहे का?

अभिनेत्री आलिया भटने करण जोहरचा लग्नसोहळ्यातील एक फोटो शेअर करून कृतज्ञता व्यक्त केली आणि त्याला वडिलांसारखे संबोधले.

करण जोहरची फिल्म इंडस्ट्रीमध्ये खूप मोठी फॅन फॉलोइंग आहे. कियारा अडवाणीने करणसाठी वाढदिवसाचा खास व्हिडिओही पोस्ट केला आहे. कियारा तिच्या चांगल्या करिअरसाठी करण जोहरचे आभार मानले.

यासोबत मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांनीही इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत करणला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मलायकाने करणच्या मनाचे सोन्यासारखे वर्णन केले, तर अर्जुनने कॉफी विथ करणच्या सेटवरील एक फोटो शेअर केला आहे.

टॅग्स :करण जोहरआलिया भटकरिना कपूरमलायका अरोरा