आजच्या घडीला करण जोहर (Karan Johar) बॉलिवूडमधील सर्वात मोठ्या चित्रपट निर्मात्यांपैकी एक आहे. त्याचं प्रोडक्शन हाऊस धर्माच्या बॅनरखाली बॉलिवूडमधील अनेक मोठ्या चित्रपटांची निर्मिती झाली आहे. अलीकडेच एका वेबसाईटशी संवाद साधताना करण जोहरने आज बॉलिवूडची जी परिस्थिती आहे त्यामागचे कारण काय आहे हे सांगितले. या परिस्थिती आपणच जबाबदार असल्याचं सांगितलं आहे.
करण जोहरने Galatta Plus ला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आपल्याकडे पाठीचा कणा नाही आणि दृढ निश्चय नाही जो. बॉलिवूडमध्ये कधीकधी ट्रेंड आणि फायद्याचा विचार करतो. तो म्हणाला, 'मुंबई आणि दिल्लीतील 60 ते 70 टक्के प्रेक्षक चित्रपट पाहायला जातात, त्यामुळे चित्रपटाच्या व्यवसायात फरक पडतो. पण आता हे गणित बदलं आहे. महामारीच्या आधी प्रेक्षक ज्या प्रकारे चित्रपट पाहायला जायचा, आता मात्र तसं नाहीय.
करण जोहर म्हणाला की, आता चित्रपट आधी सारखे कमाई करत नाहीत आणि येणार्या काळातही कमावणार नाहीत, पूर्वी जे चित्रपट 70 कोटी कमावत होते, आता त्याचा गल्ला 30 कोटींवर आला आहे. आता तुम्हाला फक्त 30 कोटींनाच 70 कोटी म्हणून स्वीकारावे लागेल. आगामी काळात हे आकडे बदलतील असे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
बॉलिवूडमधील त्रुटीबद्दल बोलताना करण जोहर म्हणतो, 'संपूर्ण हिंदी चित्रपटसृष्टीत एक मोठी समस्या आहे की आपला कथेवर विश्वास नाहीय. सलीम-जावेद यांच्या रूपाने खरा आवाज मिळाला होता, जे सिनेमातील पात्र जिवंत करत होते. ७० च्या दशकापर्यंत सलीम-जावेद यांनी मूळ कथा आणि पात्रे जपून ठेवली होती. त्यानंतर अँग्री हिरो सिनेमात दिसू लागले. मग 80 च्या दशकात काहीतरी घडलं आणि आम्ही चित्रपटांचे रिमेक करायला सुरुवात केली. तिथूनच आम्ही विश्वास गमावून बसलो. आम्ही प्रत्येक तामिळ आणि तेलुगु चित्रपटाचा रिमेक करू लागलो.
काही चित्रपट हिट झाल्यानंतर बॉलिवूडमध्येही हाच ट्रेंड सुरू झाला. याबाबत करण जोहर म्हणतो, '९० च्या दशकात आपण एक लव्हस्टोरी पाहिली, ज्याने संपूर्ण देशाच्या हृदयात स्थान निर्माण केले. 'हम आपके है कौन'. त्यानंतर माझ्यासह सर्वांनी लव्हस्टोरी सिनेमा करायला सुरुवात केली. मात्र यामुळे ७० च्या दशकातील आपल्या मुळ कथांपासून आपण भरकटलो.
करण सांगतो की 2001 मध्ये आलेल्या 'लगान' चित्रपटानंतर सर्वांनी असेच चित्रपट बनवायला सुरुवात केली. त्यानंतर 2010 मध्ये जेव्हा दबंग चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटला तेव्हा आम्हाला वाटले की कमर्शिल चित्रपटांचं दिवस आले आहेत. आणि प्रत्येकजण पुन्हा तसेच चित्रपट बनवू लागला. करण जोहर म्हणतो, आपल्याकडे पाठीचा कणा नाही आणि दृढ निश्चय नाही जो अन्य इंडस्ट्रीकडून घेण्याची गरज आहे.. हे मी माझ्याबाबतीतही सांगतोय..