Join us

Ufff!! शनाया कपूरची पहिली जाहिरात अन् करण जोहरच्या डोक्याला नसता ताप!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 17:41 IST

शनाया कपूरच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जातेय आणि सोबत करणही ट्रोल होतोय.

ठळक मुद्देशनायाला धर्मा प्रॉडक्शन लॉन्च करणार, अशी घोषणा करणने केली, तेव्हाही तो असाच ट्रोल झाला होता.

सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिजम अर्थात घराणेशाहीचा मुद्दा चर्चेत आला आणि करण जोहर (Karan Johar ) सर्वाधिक ट्रोल झाला. करण फक्त स्टार किड्सला लॉन्च करतो, त्यांनाच प्रमोट करतो, असा आरोप पूर्वापार होत आला आहे. अशात  संजय कपूरची लेक शनाया कपूर (Shanaya Kapoor) हिलाही करण जोहर हाच लॉन्च करणार म्हटल्यावर  तो पुन्हा लक्ष्य होणारच. याच शनाया कपूरच्या एका जाहिरातीची सध्या सोशल मीडियावर जबरदस्त खिल्ली उडवली जातेय आणि सोबत करणही ट्रोल होतोय.

जाहिरातीत शनाया नूडल्स खाताना दिसतेय आणि नूडल्स खात खात तिचं फोटोशूट सुरू आहे. या जाहिरातीचा व्हिडीओ करणने शेअर केला आणि तो पाहताच लोकांनी शनाया आणि सोबत करणची मजा घ्यायला सुरूवात केली.

अनेकांनी  ‘ओव्हरअ‍ॅक्टिंग की दुकान’ म्हणत शनायाला ट्रोल केलं. काहींनी ही अनन्या पांडेची कॉपी करतेय म्हणत, तिला ‘कॉपी कॅट’ म्हटलं. ही सोनम कपूरपेक्षाही मोठी फ्लॉप होणार, असं एका युजरने लिहिलं. विशेष म्हणजे, शनायाला ट्रोल करता करता अनेकजण करण जोहरवरही घसरले. हे काय करण? ती एकदम डोक्यात जाते, असे एका युजरने कमेंट करताना लिहिले. ट्रोलर्सच्या कमेंट्स इतक्या वाढल्या की, करणने अखेर त्याच्या व्हिडीओचे कमेंट सेक्शनच बंद केले.शनायाला धर्मा प्रॉडक्शन लॉन्च करणार, अशी घोषणा करणने केली, तेव्हाही तो असाच ट्रोल झाला होता.21 वर्षाची शनाया संजय कपूरची लेक आहे. अद्याप तिच्या डेब्यू सिनेमाची घोषणा झालेली नाही. पण त्याआधीच लोक तिला ओळखू लागले आहेत. शनाया सोशल मीडियावर प्रचंड अ‍ॅक्टिव्ह आहे. इन्स्टावर तिचे असंख्य फॉलोअर्स आहेत. शाहरूखची लेक सुहाना खानची ती बेस्ट फ्रेन्ड आहे.

टॅग्स :करण जोहरशनाया कपूर