Join us

कुटुंबाचा जीव धोक्यात घालून चित्रपट पाहावा का? करण जोहरवर भडकले नेटकरी

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2021 12:55 PM

ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने शाळा, कॉलेज, जिम आणि सिनेमा हॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

कोरोना व्हायरसच्या नवीन ओमायक्रॉन व्हेरिएंटने जगासह भारताची चिंता वाढवली आहे. भारतात कोरोनासह या नवीन ओमायक्रानच्या प्रकरणांमध्ये सातत्याने वाढ होत आहेत. या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत ‘यलो अलर्ट’जारी करण्यात आला आहे. दिल्ली सरकारने शाळा, कॉलेज, जिम आणि सिनेमा हॉल बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीतील चित्रपटगृहे बंद झाल्यानंतर चित्रपटसृष्टीत तणाव निर्माण झाला आहे. पुन्हा लॉकडाऊन होण्याची भीती सर्वांनाच आहे. यातच करण जोहरने दिल्ली सरकारला चित्रपटगृहे उघडण्याचे आवाहन केले आहे. पण, त्याच्या या आवाहनानंतर नेटकरी करणवर चांगलेच भडकले.

करण जोहरने ट्विटरवरुन सिनेमा हॉल पुन्हा सुरू करण्याचे आवाहन दिल्ली सरकारला केले आहे. करण जोहरने लिहिले की, आम्ही दिल्ली सरकारला चित्रपटगृहे उघडण्याची विनंती करत आहोत. थिएटर सामाजिक अंतर आणि स्वच्छता राखण्यासाठी सुविधांनी सुसज्ज आहे, त्यामुळे ते उघडले जाऊ शकतात. करण जोहरने आपल्या ट्विटमध्ये दिल्ली सरकार आणि मुख्यमंत्री केजरीवाल यांनाही टॅग केले आहे.

करण जोहरच्या या ट्विटवर सरकारचे उत्तर कधी येईल हे माहीत नाही, पण जनतेने त्याला नक्कीच ट्रोल करायला सुरुवात केली आहे. पाहा सोशल मीडियावर करण जोहरवर कशाप्रकारे आपला राग व्यक्त करत आहेत.

MAIने चित्रपटगृहे सुरू करण्याची मागणी केली

या संदर्भात मल्टिप्लेक्स असोसिएशन ऑफ इंडिया (MAI) च्या सदस्यांनी गुरुवारी दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांची भेट घेतली. यासोबतच त्यांनी मनीष सिसोदिया यांना त्यांच्या निर्णयावर पुनर्विचार करण्याची विनंती केली. चित्रपटगृहे बंद करण्याऐवजी सरकारने अन्य पर्यायावर भर द्यावा, असे एमएआयचे म्हणणे आहे.

सिनेमा हॉल बंद झाल्यामुळे पुन्हा एकदा चित्रपट निर्माते आणि कलाकारांना मोठा तोटा सहन करावा लागणार आहे. Omicron मुळे 83 च्या कमाईवर वाईट परिणाम झाला. यामुळेच शाहिदचा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट जर्सीची रिलीज डेट पुढे ढकलण्यात आली आहे. आता दिल्ली सरकार चित्रपट निर्मात्यांकडे किती लक्ष देते ते बघण्यासारखे आहे.

टॅग्स :करण जोहरओमायक्रॉनदिल्ली