बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक करण जोहर (Karan Johar) खरं तर सिंगल आहे. पण आपल्या रिलेशनशिप स्टेटसमुळे तो सतत चर्चेत असतो. तिशी-चाळीशीच्या घरात करणलाही पार्टनरची गरज वाटत होती. आपलं कुणी असावं, असं त्याला वाटायचं. पण आता गोष्टी बदलल्या आहेत. होय, आता करणला आयुष्यात आपली मुलं व आईशिवाय कुणीही नको. होय, खुद्द करणने हा खुलासा केला आहे.‘Tweak India’मध्ये ट्विंकल खन्नाला दिलेल्या मुलाखतीत करण आपल्या पर्सनल लाईफबद्दल भरभरून बोलला.
आता मला कुणीही नको...दुसऱ्याच्या आयुष्यात रोमान्स पेरणारा तू, आयुष्यात तुला कधी पार्टनरशिवाय एकाकी वाटलं नाही का? असा प्रश्न टिष्ट्वंकलने करणला केला. यावर करण म्हणाला, आता माझी दोन्ही मुलं यश व रूही माझ्यासोबत आहेत. माझी आई हिरू माझ्यासोबत आहे. या तिघांशिवाय आता मला माझ्या आयुष्यात दुसरं कुणीही नको. अनेक वर्षे सिंगल राहिल्यानंतर मला एक मला जाणवलीये. ती म्हणजे, मी स्वत: स्वत:चा मालक आहे. आता मी फक्त माझी मुलं आणि आईबद्दल फिल करतो. आता मला अन्य कुणाचीही गरज नाही. गेल्या 50 वर्षांत एकाही 'सॉलिड रिलेशनशिप' नव्हतो. मी रिलेशनशिपमध्ये येऊ शकतो, असं मला काही प्रसंगी वाटलं. पण असं कधीच झालं नाही. कारण दरवेळी रिलेशनशिपमधून पळ काढणारा मीच पहिला होतो. यासंदर्भात मी फारच ‘मेस्ड अप’ आहे, असं मला वाटतं.
जेव्हा कुणी माझ्या जवळ येतं...जे मला फार महत्त्व देत नाहीत, अशाच लोकांच्या मी प्रेमात पडतो आणि जेव्हाकेव्हा कुणी माझ्या जवळ येतं, तेव्हा मीच तिथून पळ काढतो. ही एक मोठी अडचण आहे. मी यासंदर्भात थेरपिस्ट आणि सायकॉलॉजिस्टशी देखील बोललो. मला नातं का नको आहे? मी असा का आहे? यावरचे सेशन्सही मी घेतले. ज्या क्षणाला प्रेम वाढू लागतं, त्याक्षणी जणू मला कुणी कैद केलं आहे, असं मला वाटायला लागतं. मला तो पिंजरा तोडून बाहेर पडावं वाटतं. पण जेव्हा माझ्याकडे प्रेम नसतं, तेव्हा मी त्यामागे धावतो. कदाचित बालपणीच्या अनेक गोष्टी माझ्या मनावर कोरल्या गेल्या आहेत. अनेक प्रसंगामुळे, अनुभवांमुळे मी असा झालो आहे, असं करण म्हणाला.
याआधी ‘कॉफी विद करण 7’मध्ये करण आपल्या रिलेशनशिपबद्दल बोलला होता. सध्या मी सिंगल आहे. माझं ब्रेकअप झालं आहे. ब्रेकअप झालं तेव्हा मी निराश होतो. त्यातून बाहेर पडण्यासाठी वरूण धवनने मला मदत केली होती, असं करणने सांगितलं होतं.