Join us

करण जोहर बळकावणार सलमान खानचे ‘तख्त’ ?  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2019 16:14 IST

गत काही वर्षांत ईद म्हटले की, सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. प्रत्येक ईदला भाईजानचा सिनेमा झळकतो आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतो. पण २०२० हे वर्ष मात्र भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी काहीसे वेगळे असणार आहे.

ठळक मुद्दे‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल.

गत काही वर्षांत ईद म्हटले की, सलमान खानचा सिनेमा हे जणू समीकरण झाले आहे. प्रत्येक ईदला भाईजानचा सिनेमा झळकतो आणि बॉक्सआॅफिसवर धूम करतो. पण २०२० हे वर्ष मात्र भाईजान आणि त्याच्या चाहत्यांसाठी काहीसे वेगळे असणार आहे. होय, ताजी चर्चा खरी मानाल तर पुढील वर्षी ईदच्या मुहूर्तावर निर्माता-दिग्दर्शक करण जोहर त्याचा चित्रपट रिलीज करण्याच्या तयारीत आहेत.दरवर्षी ईदला सलमानचा चित्रपट प्रदर्शित होतो. पण २०२० च्या ईदला करण जोहर त्याचा बिग बजेट चित्रपट ‘तख्त’ प्रदर्शित करू इच्छितो. ‘तख्त’ला एक मोठी रिलीज डेट मिळावी, अशी करणची इच्छा आहे आणि यासाठी त्याने ईदचे मुहूर्त निवडले आहे. सलमानने अद्याप २०२०ची ईद ‘बुक’ केलेली नाही. पण जाणकारांचे मानाल तर ‘दबंग 3’ हा भाईजानचा चित्रपटही या मुहूर्तावर रिलीज होऊ शकतो. सध्या भाईजान ‘भारत’ या चित्रपटात बिझी आहे. हा चित्रपट यंदा ईदला रिलीज होतोय. ‘भारत’ हातावेगळा केल्यानंतर सलमान लगेच ‘दबंग 3’च्या शूटींगला लागणार आहे. ‘दबंग 3’साठीही भाईजानने ईदचे मुहूर्त निवडलेच तर बॉक्सआॅफिसवर थेट सलमान विरूद्ध करण असा सामना रंगू शकतो. त्यामुळे हा सामना रंगतो की रद्द होतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

‘तख्त’ या पीरियड ड्रामात अर्थात ऐतिहासिक चित्रपटात मुघल शासनकाळातील एक कथा दाखवली जाईल. राजसिंहासनावरचे पे्रम आणि ते मिळवण्यासाठीची वाट्टेल त्या स्तराला जाण्याचे मनसुबे असे याचे कथानक असेल. शहाजहान आणि मुमताज यांच्या दोन मुलांच्या अर्थात दोन भावंडांमधील सिंहासनासाठीच्या वादाची कथा यात दिसेल. करण जोहर निर्मित या चित्रपटात रणवीर सिंग, करिना कपूर, आलिया भट्ट, जान्हवी कपूर, अनिल कपूर, विकी कौशल आणि भूमी पेडणेकर असे तगडे कलाकार आपले अभिनय कौशल्य पणाला लावताना दिसतील. रणवीर व विकी यात दोन भावांची भूमिका साकारतील. आलिया रणवीरच्या प्रेयसीची तर करिना त्याच्या बहिणीच्या भूमिकेत असेल. जान्हवी कपूर विकी कौशलच्या पत्नीची भूमिका वठवतील.

टॅग्स :सलमान खानकरण जोहरतख्तदबंग 3