पद्मश्री मिळाल्यावर Karan Johar नं आईसह शेअर केला फोटो; सांगितलं यश आणि रूहीनं मेडल पाहून काय विचारलं

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2021 09:54 PM2021-11-09T21:54:09+5:302021-11-09T21:55:10+5:30

Karan Johar on Padma Shri : एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर आपल्या मुलांची आणि आई हीरू जोहर यांची प्रतिक्रिया होती याची माहिती त्यानं दिली आहे.

karan johar twins yash roohi first reaction on padma shri award shared pictures with hiroo johar | पद्मश्री मिळाल्यावर Karan Johar नं आईसह शेअर केला फोटो; सांगितलं यश आणि रूहीनं मेडल पाहून काय विचारलं

पद्मश्री मिळाल्यावर Karan Johar नं आईसह शेअर केला फोटो; सांगितलं यश आणि रूहीनं मेडल पाहून काय विचारलं

googlenewsNext

पद्मश्री (Padma Shri) हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने (Karan Johar) त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर आपल्या मुलांची आणि आई हीरू जोहर यांची प्रतिक्रिया होती याची माहिती त्यानं दिली आहे. यासोबतच त्यांने आपला आनंदही व्यक्त केला आहे.

पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर करण जोहरने त्याची आई हीरू जोहर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या आईसोबत पद्मश्री पुरस्कारासह कोटमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना करण म्हणाला की यश आणि रुही पुरस्कारासाठी उत्सुक होते. ती संध्याकाळ माझ्या आयुष्यातील एक आठवणीतला क्षण होता. मला खात्री होती एक दिवस माझ्या वडिलांना आणि आईला अभिमान वाटेल. माझ्या मुलांनी मला विचार तू मेडल जिंकलास का, त्यावेळी मी त्यांना हो म्हटलं आणि तुम्हालाही हे मिळेल अशी आशा करतो असं सांगितलं. पद्मश्री मिळाल्याबद्दल नम्र आणि सन्मानित वाटत आहे, असंही तो म्हणाला.

 
सोमवारी राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी सर्व विजेत्यांचा पुरस्कार देऊन गौरव केला. बॉलिवूडचा हा सन्मान करण जोहर, अभिनेत्री कंगना रणौत आणि दिग्दर्शक-निर्माता एकता कपूर यांना देण्यात आला. पद्मश्री पुरस्कार जाहीर झाल्यानंतर करण जोहरने ट्विटरवर आपला आनंद व्यक्त केला.

Web Title: karan johar twins yash roohi first reaction on padma shri award shared pictures with hiroo johar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.