पद्मश्री (Padma Shri) हा सर्वोच्च पुरस्कार मिळाल्यानंतर बॉलिवूड दिग्दर्शक आणि निर्माता करण जोहरने (Karan Johar) त्याच्या इंस्टाग्रामवर (Instagram) एक पोस्ट शेअर केली आहे. एवढा मोठा सन्मान मिळाल्यानंतर आपल्या मुलांची आणि आई हीरू जोहर यांची प्रतिक्रिया होती याची माहिती त्यानं दिली आहे. यासोबतच त्यांने आपला आनंदही व्यक्त केला आहे.
पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानंतर करण जोहरने त्याची आई हीरू जोहर यांच्यासोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तो आपल्या आईसोबत पद्मश्री पुरस्कारासह कोटमध्ये दिसत आहे. फोटो शेअर करताना करण म्हणाला की यश आणि रुही पुरस्कारासाठी उत्सुक होते. ती संध्याकाळ माझ्या आयुष्यातील एक आठवणीतला क्षण होता. मला खात्री होती एक दिवस माझ्या वडिलांना आणि आईला अभिमान वाटेल. माझ्या मुलांनी मला विचार तू मेडल जिंकलास का, त्यावेळी मी त्यांना हो म्हटलं आणि तुम्हालाही हे मिळेल अशी आशा करतो असं सांगितलं. पद्मश्री मिळाल्याबद्दल नम्र आणि सन्मानित वाटत आहे, असंही तो म्हणाला.