Join us  

करण जोहरला करायचे होते ‘दंगल’चे दिग्दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2017 2:32 AM

जगभरात धूम उडवून देणाऱ्या आणि कमाईचे कित्येक रेकॉर्ड नावावर करणाऱ्या ‘दंगल’ या सिनेमाचे करण जोहरला दिग्दर्शन करायचे होते.

जगभरात धूम उडवून देणाऱ्या आणि कमाईचे कित्येक रेकॉर्ड नावावर करणाऱ्या ‘दंगल’ या सिनेमाचे करण जोहरला दिग्दर्शन करायचे होते. करणने त्याची ही इच्छा ट्विटरवर व्यक्त केली असून त्यामागे करणचा नेमका हेतु काय? हे मात्र स्पष्ट होऊ शकले नाही. खरं तर करण सोशल नेटवर्किंग साइट ट्विटरवर नेहमीच सक्रिय असतो. ट्विटरवर जेव्हा त्याच्या फॅन्सने त्याला ‘तू बघितलेला अखेरचा असा कोणता सिनेमा आहे, ज्याचे तुला दिग्दर्शन करावेसे वाटले’ असे विचारले तेव्हा त्याने क्षणाचाही विलंब न करता ‘दंगल’ सिनेमाचे नाव पुढे केले. बॉलिवूडमधील करणचे योगदान कौतुकास्पद असून त्याने व्यक्त केलेली इच्छा त्याच्या प्रतिष्ठेला शोभणारी आहे. कारण ‘दंगल’ या सिनेमाने प्रेक्षकांच्या मनोरंजनाबरोबरच कमाईच्या बाबतीतही आघाडी घेतली आहे. मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिर खानची प्रमुख भूमिका असलेला ‘दंगल’ हा सिनेमा बायोपिक असून हरियाणाच्या फोगट कुटुंबावर आधारित आहे. या सिनेमाने केवळ भारतातच नव्हे तर जागतिक पातळीवरदेखील प्रेक्षकांची पसंती मिळवली आहे. त्यामुळे अशा सिनेमाच्या दिग्दर्शनाची करणने इच्छा व्यक्त करणे स्वाभाविक समजले जात आहे. ट्विटरवर त्याला त्याच्या फेव्हरेट सिनेमाविषयी यावेळी विचारण्यात आले. त्याने ‘माय नेम इज खान’ हा माझा फेव्हरेट सिनेमा असल्याचे म्हटले आहे.