Alia Bhatt and Ranbir Kapoor wedding : अखेर रणबीर कपूर (Ranbir Kapoor ) व आलिया भट (Alia Bhatt ) हे बॉलिवूडचं गोड कपल लग्नाच्या आणाभाका घेण्यासाठी सज्ज झालं आहे. येत्या 13 ते 17 एप्रिल दरम्यान हे कपल लग्नबंधनात अडकणार असल्याचं मानलं जातंय. अद्याप कपूर वा भट कुटुंबांकडून या लग्नाबद्दल कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही. पण हो, आलियावर जीवापाड प्रेम करणारा आणि बॉलिवूड इंडस्ट्रीत तिचा गार्डियन असलेल्या करण जोहरने (Karan Johar) अप्रत्यक्ष का होईना या लग्नाची घोषणा केलीये. एका खास अंदाजात त्याने रणबीर व आलिया या दोघांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
करणने काही क्षणांपूर्वी एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ रणबीर व आलियाच्या आगामी ‘ब्रह्मास्त्र’ या चित्रपटातील ‘केसरियां’ गाण्याचा आहे. या गाण्यात आलिया व रणबीर एकमेकांत हरवलेले दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करताना करणने लिहिलेलं कॅप्शन लक्षवेधी आहे.‘प्रेम हा प्रकाश आहे आणि मला माहितीये, या प्रेमानं तुम्ही एकमेकांचं आणि आमचं आयुष्य उजळून टाकलंय... तुमच्या नव्या सुरुवातीसाठी आणि भावी आयुष्यासाठी खूप सारं प्रेम....,’ असं कॅप्शन देत करणने हा व्हिडीओ शेअर केला आहे. संपूर्ण ‘ब्रह्मास्त्र’च्या टीमनेही आलिया व रणबीरला शुभेच्छा दिल्या आहेत. या शुभेच्छा लग्नासाठी आहेत, हे सांगणे नकोच.
करण जोहरने आलियाला देणार खास भेटकरण जोहरने लाडक्या आलियाला लग्नाचं एक खास भेट देणार आहे. ताज्या माहितीनुसार, धर्मा प्रॉडक्शनकडून आलियाला एक खास आरसा भेट म्हणून मिळाला आहे. धर्मा प्रॉडक्शनच्या स्टाफ मेंबर्सनी नुकतीच ही भेट आलियाच्या घरी पोहोचती केली. हा आरसा लाकडी खोक्यात होता. करणनेच आलियाला पहिला ब्रेक दिला होता. ‘स्टुडंट आॅफ द ईअर’ या करणच्या चित्रपटातून आलियाचा डेब्यू झाला होता.