Join us

करण जोहरच्या आत्मचरित्रातील इंग्रजी समजून घेताना कपिल शर्माची झाली होती वाईट अवस्था

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2019 6:04 PM

द कपिल शर्मा शो मध्ये कपिल शर्माने करणच्या आत्मचरित्राबद्दलचे आपले कुतूहल व्यक्त केले. कपिलने सांगितले की, हे पुस्तक वाचताना काही शब्दांचे अर्थ कळत नसल्याने त्याला करणला याबाबत विचारण्याची वेळ आली होती.

ठळक मुद्देकरणच्या अॅन अनसुटेबल बॉय या आत्मचरित्राबद्दल बोलताना कपिलने सांगितले की, त्याने या पुस्तकातील केवळ पहिले प्रकरण वाचताना सुमारे 113 शब्द त्याला कळत नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी चक्क करणलाच विचारले होते.

बॉलिवूडची सेनोरिटा काजोल देवगन आणि बॉलिवूडचा ‘द ग्रेट’ दिग्दर्शक करण जोहर यांच्यातली भांडणं तुम्हाला ठाऊक आहेतच. ते दोघे कित्येक वर्षांपासून एकमेकांशी बोलत नाहीत. मध्यंतरी काजोलने आमच्यातील सर्व भांडणे संपलीत आम्ही पुन्हा एकत्र आलो असे ट्विट  देखील केले होते. मात्र, अलीकडेच सोनी वाहिनीवरील कॉमेडी शो कपिल शर्मा शोमध्ये हे दोघे बिछडे यार, दोस्त काजोल-करण एकमेकांना भेटले. काजोलने स्वत: त्यांचा सेटवरचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यांना एकत्र आणण्यात अर्थात कपिल शर्माच यशस्वी ठरला असे म्हणायला हरकत नाही. 

कुछ कुछ होता है, कभी खुशी कभी गम आणि माय नेम इज खान यांसारखे अनेक हिट चित्रपट करण आणि काजोलच्या जोडीने या चित्रपटसृष्टीला दिले आहेत. करण जोहरने काही दिवसांपूर्वी त्याचे आत्मचरित्र लिगिले होते. अॅन अनसुटेबल बॉय या त्याच्या आत्मचरित्राची प्रचंड चर्चा झाली होती. या कार्यक्रमात कपिल शर्माने करणच्या आत्मचरित्राबद्दलचे आपले कुतूहल व्यक्त केले. कपिलने सांगितले की, हे पुस्तक वाचताना काही शब्दांचे अर्थ कळत नसल्याने त्याला करणला याबाबत विचारण्याची वेळ आली होती.

इंग्रजी भाषेवरील अद्भुत प्रभुत्वाबद्दल ओळखल्या जाणार्‍या कपिल शर्माला नेहमी असे कुतूहल वाटायचे की, करण जोहरचा शब्दकोश आणि शब्दांची निवड यामागचे रहस्य काय असेल. त्याने गंमतीने करण जोहरच्या आत्मचरित्रातील काही भाग वाचून दाखवला आणि त्यातील काही शब्दांचे अर्थ प्रत्यक्ष करणलाच विचारले.

 करणच्या अॅन अनसुटेबल बॉय या आत्मचरित्राबद्दल बोलताना कपिलने सांगितले की, त्याने या पुस्तकातील केवळ पहिले प्रकरण वाचताना सुमारे 113 शब्द त्याला कळत नव्हते. त्यामुळे त्यांचा अर्थ जाणून घेण्यासाठी मी चक्क करणलाच विचारले होते. त्यावर करण मस्तीत म्हणाला, “मी गेल्या 10 वर्षांपासून कपिलची भाषा सुधारण्याचा प्रयत्न करत आहे. पण सारेच व्यर्थ ठरले आहे.” त्यावर काजोलने म्हटले की, कपिलचे इंग्रजी हे त्याच्या फॅशनसारखे आहे. त्यावर कपिल मजेत म्हणाला की, ‘फॅशन डिझाइनर, यू आर फायर’.

 द कपिल शर्मा शोचा हा गंमतीदार भाग प्रेक्षकांना शनिवारी आणि रविवारी रात्री 9:30 वाजता सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :कपिल शर्मा द कपिल शर्मा शोकरण जोहरकाजोल