ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 12 - करण जोहर आणि काजोलमधल्या नात्यासंदर्भात 'द अनसुटेबल बॉय' या आत्मचरित्रातून करणने खळबळजनक खुलासे केले आहेत. करण जोहर आणि काजोलमध्ये नात्यामधली कोणतीही गोष्ट आता अजय देवगणमुळे लपून राहिलेली नाही. ए दिल ए मुश्कील आणि शिवाय या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनादरम्यान दोघांमध्ये खटके उडाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यावेळी 'शिवाय'ची निंदा करण्यासाठी ए दिल ए मुश्कील या चित्रपटाचा दिग्दर्शक करण जोहरनेच के. आर. केला २५ लाख रुपये दिल्याचा खळबळजनक आरोप अजयने ट्विटरच्या माध्यमातून केला होता. त्याला काजोलनंही रिट्विट करून शॉक असं लिहिलं होतं. त्यानंतर दोघांच्या वादात काजोलनं इन्ट्री केल्यानं करण जोहरला काहीसा धक्का बसला होता.
त्याबद्दल करण जोहर लिहितो, आता सर्व संपलं आहे, ती माझ्या आयुष्यात कधीच परत येऊ शकणार नाही. मला असं वाटत नाही तिलाही हे हवंय, सेटवर मी तिच्यासाठी काहीच करणार नाही. तो विषय आता संपला आहे. 25 वर्षांपासून माझ्यासोबत तिचं असलेलं भावनिक नातं आता संपुष्टात आलं आहे. काजोलशी मला आता कोणतेच नाते ठेवायचे नाही. काही काही गोष्टींनी माझ्या मनात खोलवर परिणाम केला आहे. कारण मी नेहमीच तिला संरक्षण देण्याचा प्रयत्न करत होतो. त्यामुळे आता दोघांमध्ये नाते टिकून राहणे शक्य नाही. मला आता त्याच्यावर काही बोलायचं नाही. आम्ही आता समोर आल्यावर फक्त हॅलो बोलतो आणि निघून जातो. ('शिवाय'च्या बदनामीसाठी करण जोहरने २५ लाख दिले - अजय देवगण)(करण जोहरचा 'गे' होण्यावर पहिल्यांदाच खुलासा)खरं तर तिच्यात आणि माझ्यात कोणताच वाद नाही. तर तो तिचा नवरा अजय देवगण आणि माझ्यात आहे. ते आम्हा दोघांनाही माहीत आहे. मला असं वाटत होतं की याच्यावर माफी मागायला हवी, मात्र तिला तसे वाटत नव्हते. तिने आमच्या 25 वर्षांच्या मैत्रीचा विचार न करता स्वतःच्या पतीला पाठिंबा दिला होता. तो तिचा विशेषाधिकार आहे. या वादामुळे गेल्या काही महिन्यांपासून आम्ही बोलत नव्हतो, त्याचा तिने कधीच विचार केला नाही, असंही करण जोहरनं 'द अनसुटेबल बॉय'मध्ये म्हटलं आहे.