Join us

करण जोहरची मनीष मल्होत्राच्या वाढदिवशी खास पोस्ट; म्हणाला - 'आय लव्ह यू...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2023 17:48 IST

आज मनीष मल्होत्रा त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे. ​​

भारतातील सर्वात प्रसिद्ध आणि लोकप्रिय फॅशन डिझायनर्सपैकी एक मनीष मल्होत्रा आहे. आज मनीष त्याचा ५७ वा वाढदिवस साजरा करत आहे.  त्यांच्यावर चाहत्यांकडून आणि मित्रांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. दिग्दर्शक करण जोहरनेमनीष मल्होत्रासाठी खास पोस्ट करत वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

करण जोहरने इन्स्टाग्रामवर एक स्टोरी पोस्ट केली आहे. यात त्याने त्याचा आणि  मनीष मल्होत्राचा एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहले, ' गेल्या ३० वर्षांपासून माझा मित्र असलेल्या मनिषला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. माझ तुझ्यावर प्रेम आहे.  मनीष जर सकारात्मकता आणि जीवन जगण्याच्या निखळ आनंदाला एक चेहरा असता तर तो तुझा असता. बोटॉक्स-मुक्त चेहरा जो इतका तरुण दिसतो, यसाठी एक स्वतःचे वेगळं संग्रहालय पाहिजे. तुझ्यावर खूप प्रेम'

करण व्यतिरिक्त, मलायका अरोरा, करिश्मा कपूर, परिणीती चोप्रा, वाणी कपूर, पुलकित सम्राट आणि भूमी पेडणेकर यांसारख्या इतर अनेक बी-टाउन सेलिब्रिटींनी मनीषला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. मनीष मल्होत्रा आपल्या अप्रतिम डिझाइन्ससाठी देशातच नाही तर जगभरात प्रसिद्ध आहे.  बॉलिवूड सेलिब्रिटींमध्ये मनीष मल्होत्राची प्रचंड क्रेझ आहे.

टॅग्स :करण जोहरबॉलिवूडसेलिब्रिटीमनीष मल्होत्रा