लोकप्रिय टीव्ही अभिनेता करण कुंद्रा (Karan Kundra) आणि गायक मिका सिंग ( Mika Sing) सध्या नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आले आहेत. कारण आहे रिवा अरोरा. होय, केवळ 12 वर्षांच्या रिवा अरोरासोबत (Riva Arora) ऑनस्क्रीन रोमान्स केल्यामुळे लोकांनी करण कुंद्रा व मिका सिंग यांना फैलावर घेतलं आहे.
नुकताच करण आणि मिकाचे व्हिडीओ व्हायरल झाला असून दोघंही जबरदस्त ट्रोल होत आहेत. या व्हायरल व्हिडीओंमध्ये करण व मिका दोघंही ‘उरी: द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटात विकी कौशलच्या भाचीची भूमिका साकारणाऱ्या रिवा अरोरासोबत रोमान्स करताना दिसत आहेत. इंटरनेटवरच्या माहितीनुसार, रिवा ही फक्त 12 वर्षांची आहे. 12 वर्षाच्या रिवाला आपल्या रोमॅन्टिक व्हिडीओ कास्ट केल्याबद्दल नेटकरी करण कुंद्रा व मिका सिंग दोघांनाही ट्रोल करत आहेत. रिवाला मिका व करणसोबत रोमॅन्टिक अंदाजात पाहून सगळेच हैराण आहेत. व्हिडीओ पाहून लोकांनी रिवाच्या पालकांनाही ट्रोल करायला सुरूवात केली आहे.
रिवाचं वय आणि तिच्या दिसण्यावरही प्रश्न उभे केले आहेत. अनेक लोकांनी रिवाचं वय आणि तिच्या बॉडी ट्रान्सफॉर्मेशनवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. रिवा वयापेक्षा इतकी मोठी कशी काय दिसू शकते? असा प्रश्न नेटकऱ्यांना पडला आहे. तिच्या व्हिडीओवर कमेंट करत नेटकऱ्यांनी तिच्या आई- वडिलांना ट्रोल केलं आहे. पालक आपल्या मुलीला इतक्या कमी वयात इतके उत्तेजक कपडे व उत्तेजक भूमिका करायला कशी परवानगी देऊ शकतात? असा प्रश्न नेटकऱ्यांनी विचारला आहे. अनेकांनी रिवाला हार्मोन्सचे इंजेक्शन दिलं गेल्याचा दावाही केला आहे.रिवा उंच दिसावी यासाठी तिने हाय हिल्स घातल्या आहेत. यावरून लोक कमेंट्स करत आहेत.
केवळ दीड वर्षांच्या वयात तिने पहिल्यांदा रणबीर कपूरच्या ‘रॉकस्टार’मधून डेब्यू केला होता. श्रीदेवीसोबतच्या मॉम या चित्रपटात ती झळकली होती. याशिवाय जान्हवी कपूरच्या ‘गुंजन सक्सेना’ या सिनेमातही तिने काम केलं आहे.