गेल्या काही दिवसांपासून करण कुंद्रा आणि अनुषा दांडेकरच्या ब्रेकअपची चर्चा सुरु आहे. हिंदुस्तान टाईम्सच्या रिपोर्टनुसार, करण कुंद्राने हिंदुस्तान टाईम्सशी बोलताना आम्ही एकत्र आहोत, आपलं ब्रेकअप झालं नसल्याचा खुलासा केला. करण म्हणाला, काही दिवस आम्ही एकत्र राहतो काही दिवस आपल्या घरी. मी हरियाणामध्ये शूटिंग करत होतो आणि लॉकडाऊनच्या आधी मुंबईत आलो. सध्या आम्ही दोघे एकत्र राहत नाही आहोत, त्यामुळे सगळ्यांना वाटतेय आमचं ब्रेकअप झाले आहे. मी सोशल मीडियावर अॅक्टिव्ह नाही आहे म्हणून आमच्या ब्रेकअपची अफवाह पसरवण्यात आली. मला या सगळ्या गोष्टींमुळे फरक पडत नाही मात्र अनुषा इमोशनल आहे तिला फरक पडतो.
अनुषा दांडेकरसोबतच्या ब्रेकअपबाबत करण कुंद्राने सोडले मौन, केला 'हा' मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 2:54 PM