'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेतून करण मेहराने टीव्ही विश्वात पदार्पण केलं होतं. छोट्या पडद्यावर सर्वात जास्त काळ सुरु असणारी मालिका म्हणून ये रिश्ता क्या कहलाता है मालिकेनं नवा रेकॉर्ड प्रस्थापित केला होता. 12 जानेवरी 2009 पासून सुरु झालेल्या मालिकेने 9 वर्ष रसिकांचं अविरत मनोरंजन केले. अक्षरा आणि नैतिक ही जोडी रसिकांची आवडती जोडी बनली होती. अक्षराची भूमिका हिना खानने साकारली होती तर नैतिकची भूमिका करण मेहराने. दोघांनाही या मालिकेने विशेष लोकप्रियता मिळवून दिली होती.
मालिकेतली नैतिक ही भूमिका घराघरात लोकप्रिय झाली होती. नैतिकची भूमिका रसिकांना प्रचंड पसंतीस पात्र ठरली होती. मालिका सोडल्यानंतर इतर मालिका आणि शोमध्ये करण झळकला असला तरी आजही तो रसिकांसाठी त्यांचा आवडता नैतिकच आहे. त्याला नैतिक म्हणूनच आजही सारेच ओळखतात. करण मेहराचा 'ये रिश्ता क्या कहलाता है' मालिकेमुळे प्रचंड मोठा चाहता वर्ग निर्माण झाला आहे. सोशल मीडियावरही तो प्रचंड सक्रीय असतो. त्याचे कॉमेडी अंदाजातते व्हिडीओ, मजा मस्ती करतानाचे फोटो तो शेअर करताना दिसतो. त्याचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
व्हिडीओत तो पिझ्झा तयार करताना दिसत आहे. व्हिडीओच्या माध्यमातून त्याने त्याच्या करिअरच्या सुरुवातील 'डॉमिनोज पिझ्झा'मध्ये काम करण्याचा अनुभव सांगितला आहे. होय, करण अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी 'डॉमिनोज पिझ्झा'मध्ये काम करायचा. त्यावेळी तो फक्त १२ होता. समर व्हॅकेशनमध्ये त्याने 'डॉमिनोज पिझ्झा'मध्ये नोकरी केली होती. करणला अभिनेता बनायचे नव्हते तर करणला फॅशन डिझायनर व्हायचं होतं. ज्यासाठी त्यानं दिल्ली नॅशनल इन्स्टिट्यीट ऑफ फॅशन टेक्नॉलजीमधून फॅशन डिझाइनचा कोर्स पूर्ण केला होता.
'ये रिश्ता क्या कहलाता है' या मालिकेनंतर करण 'नच बलिए ५', 'साथ निभाना साथियाँ', 'बिग बॉस १०', 'खटमल-ए-इश्क', 'एक भ्रम सर्वगुण संपन्न' आणि 'शुभारंभ' या कार्यक्रमात झळकला होता. सध्या तो त्याच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. करणची पत्नी निशा रावलने घरगुती हिंसाचाराचे आरोप त्याच्यावर लावले होते. त्याच्यावर घरगुती हिंसाचारा प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच कारणामुळे त्याला जेलचीही हवा खावी लागली होती.