Join us

पहिल्यांदा समोर आला करण पटेल आणि अंकिताच्या मुलीचा क्युट फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2020 14:42 IST

करण आणि अंकिताच्या आयुष्यात मेहरच्या रुपात एक नवा आनंद आला आहे. 

करणछोट्या पडद्यावरील मोस्ट कपलच्या लिस्टमध्ये करण पटेल आणि अंकिता भार्गवचे नाव सामील आहे. करण आणि अंकिताच्या आयुष्यात मेहरच्या रुपात एक नवा आनंद आला आहे. विशेष म्हणजे 14 डिसेंबर 2019 ला जन्मलेल्या मेहरचं फॅन क्लब आतापासूनच तयार झाले आहे. मेहरचा पहिला फोटो तिच्या फॅन क्लबनेच शेअर केला आहे. मीडिया रिपोर्टनुसार अंकिताने मेहरचा हा फोटो शेअर केला होता मात्र लगेच डिलीट मारला. मात्र तेवढ्यात तो फोटो तिच्या फॅन क्लबने मात्र सेव करुन ठेवला. 

क्युट मेहर आई-बाबांच्या कुशीत शांत झोपलेली फोटोमध्ये दिसतेय. याआधी करणने मेहरसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते मात्र सगळ्या फोटोंमध्ये त्याने तिचा चेहरा लपवून ठेवला होता.  

करणने कहानी घर घर की, कसौटी जिंदगी की, केसर, काव्यांजली, करम अपना अपना यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले आहे. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता ही ये है मोहोब्बते या मालिकेमुळे मिळाली. तो नुकताच खतरों के खिलाडी या मालिकेत देखील झळकला होता.

करणप्रमाणेच अंकिता देखील अभिनेत्री आहे. तिने केसर, देखा एक ख्वाव आणि रिपोर्टस यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. लवकरच करण खतरों के खिलाडीमध्ये दिसणार आहे. करणने पटेलला ‘ये है मोहब्बतें’ या मालिकेतील रमन भल्ला या भूमिकेमुळे प्रसिद्धी मिळाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये करण पटेलने एकता कपूरची सुपरहिट मालिका सोडली आहे. खतरों के खिलाडीमध्ये सहभागी होण्यासाठी करणने ही मालिका सोडली.

टॅग्स :ये है मोहब्बतें