बिपाशा बासू आणि करण सिंग गोव्हर हे बॉलिवूडमधील हॉट कपल म्हणून ओळखले जातं. ते दोघेही सोशल मीडियावर चांगलेच सक्रिय असतात. ते त्यांचे फोटो, व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
बिपाशा आणि करण काही दिवसांपूर्वी मालदिवला व्हेकेशनसाठी गेले होते. तिथून त्यांनी त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले होते. हे फोटो पाहून बिपाशा गरोदर आहे का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडला होता. सोशल मीडियाद्वारे अनेकजण याविषयी विचारत होते. एवढेच नव्हे तर यावरून बिपाशा आणि करण यांना ट्रोल देखील केले जात होते. सुरुवातीला या दोघांनी याकडे दुर्लक्ष केले होते. पण करणने आता सिद्धार्थ कननला दिलेल्या एका रेडिओ वाहिनीवरील मुलाखतीत बिपाशा गरोदर नाही असा खुलासा केला आहे. पण या मुलाखतीत दिलेल्या एका उत्तरावरून तो सोशल मीडियावरील ट्रोलर्सवर प्रचंड भडकला असल्याचे दिसून आले. त्याने या मुलाखतीत सांगितले की, ट्रोलर्सला शक्य झालं तर ते मी देखील गरोदर आहे असे ते म्हणतील. माझ्यादेखील चेहऱ्यावर त्यांना प्रेग्नेंसी ग्लो दिसेल...
या मुलाखतीत पुढे त्याने सांगितले की, सध्या तरी आम्ही दोघे आमचे आयुष्य एन्जॉय करत आहोत. अद्याप तरी आम्ही दोघांनी मुलांबद्दल विचार केलेला नाहीये.
अलोन चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान बिपाशा आणि करण पहिल्यांदा भेटले होते. त्याचवळी दोघांची चांगली मैत्री झाली. बघता-बघता त्यांच्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. करण सिंग ग्रोव्हर आणि बिपाशा बासूची कायमच चर्चा रंगते. रेशीमगाठीत अडकल्यापासून ही जोडी कायमच या ना त्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरते. विशेषतः तिसरं लग्न केल्याने करण सिंगला सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केलं जातं. बिपाशादेखील लग्न व्हायच्याआधी जॉन अब्राहमसोबत नात्यात होती. त्यांचे अफेअर जवळजवळ दहा वर्षं सुरू होते. ते लग्न करणार असे त्यांच्या फॅन्सना वाटत असतानाच त्यांनी ब्रेकअप करत त्यांच्या चाहत्यांना धक्का दिला.