हृतिक रोशन, अनिल कपूर आणि दीपिका पदुकोणचा आगामी 'फायटर' (Fighter) सिनेमाचा टीझर काही दिवसांपूर्वीच रिलीज झाला. ट्रेलरमधील फायटर जेट्सची दृश्य थक्क करणारी होती. तसंच मुख्य कलाकारांचे लूकही समोर आले होते. आता सिनेमातील आणखी एकाचा लूक व्हायरल होतोय. तो म्हणजे स्क्वॉड्रन लीडर सरताज गिल. टीव्ही अभिनेता करण सिंह ग्रोवर (Karan Singh Grover) सरताजच्या भूमिकेत झळकणार आहे. त्याचा लूक सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे.
'फायटर' सिनेमात हृतिक, दीपिका आणि अनिल कपूरशिवाय करण सिंह ग्रोवरही असल्याचं समोर आलं आहे. यामध्ये तो स्क्वॉड्रन लीडर म्हणून एकदम धाँसू लूकमध्ये दिसतोय. काळ्या रंगाचा गॉगल, यूनिफॉर्म त्याला चांगलाच शोभून दिसतोय. हा फोटो शेअर करत त्याने आपली कॉल साईन 'ताज' असल्याचं सांगितलं आहे.
करणच्या या लूकवर सेलिब्रिटी कौतुकाचा वर्षाव करत आहेत. त्याची पत्नी आणि अभिनेत्री बिपाशा बासूने करणचा लूक शेअर करत 'हँडसम हॉट हबी' अशी प्रतिक्रिया दिली आहे. करणसाठी हा बॉलिवू़डमधील मोठा ब्रेक आहे.
काही दिवसांपूर्वीच 'फायटर' चा टीझर रिलीज झाला. काही मिनिटांच्या टीझरमध्ये हृतिक आणि दीपिका फायटर जेट प्लेन उडवताना दिसले. पहिल्यांदाच सिनेमात फायटर जेट्सच्या लढाईचा थरार पाहायला मिळणार आहे. सिनेमातील हृतिकच्या लूकवर चाहते फिदा झालेत.