बॉलिवूड कलाकार त्यांच्या मुलांच्या बाबतीत प्रचंड पझेसिव्ह आणि तितकेच प्रोटेक्टिव्ह असतात. त्यामुळे अनेक कलाकार त्यांच्या बाळांचा चेहरा पटकन रिव्हिल करत नाहीत. साधारणपणे बाळ एक वर्षाचं झाल्यानंतर ही कलाकार मंडळी त्यांच्या बाळाची झलक नेटकऱ्यांना दाखवतात. अलिकडेच अभिनेत्री आलिया भट्ट (alia bhat) आणि रणबीर कपूर ( ranbir kapoor) यांनी राहाची पहिली झलक चाहत्यांना दाखवली. त्यांच्यानंतर आता अभिनेत्री बिपाशू बासूने (bipasha basu) सुद्धा तिच्या लेकीचा चेहरा नेटकऱ्यांना दाखवला आहे.
बिपाशाने आतापर्यंत तिच्या लेकीसोबत म्हणजेच देवीसोबत अनेक फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. परंतु, या सगळ्यात देवीचा चेहरा कुठेच नीट दिसत नव्हता. मात्र, ख्रिसमसचं निमित्त साधत बिपाशाने तिच्या लेकीची पहिली झलक दाखवली.
बिपाशाने शेअर केलेल्या फोटोमध्ये देवी ख्रिसमस ट्रीच्या बाजूला बसली आहे. या फोटोमध्ये पहिल्यांदाच देवीचा चेहरा नेटकऱ्यांना व्यवस्थित पाहता आला आहे. विशेष म्हणजे बिपाशाची लेक हुबेहूब करणसिंह ग्रोवरची कॉपी असल्याचं दिसून येतं. दरम्यान, बिपाशाने देवीचा चेहरा रिव्हिल केल्यामुळे चाहते कमालीची खूश झाले आहेत. त्यांनी या पोस्टवर अनेक कमेंट केल्या आहेत. इतकंच नाही तर देवीच्या क्यूटनेसमुळे सेलिब्रिटीही बिपाशाच्या पोस्टवर कमेंट करत आहेत.