Join us

म्हणून अमिताभ बच्चन यांच्याकडून करण व्होराने घेतली प्रेरणा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2019 6:30 AM

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत डॉ. वीर सहायची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होरा आपल्या  सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे.

ठळक मुद्देडॉ. वीरची भूमिका साकारण्यासाठी करण व्होराने अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा घेतली

‘स्टार प्लस’वरील ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेत डॉ. वीर सहायची भूमिका साकारणारा अभिनेता करण व्होरा आपल्या  सहज आणि प्रभावी अभिनयाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे. डॉ. वीरची व्यक्तिरेखा ही काहीशी नकारात्मक असून त्याला त्याच्या भूतकाळात काही कटू अनुभव घ्यावे लागल्याने आज त्याचा स्वभाव अस बनला आहे. आपली ही व्यक्तिरेखा साकारण्यासाठी करणने चक्क अमिताभ बच्चन यांच्याकडून प्रेरणा घेतली आहे, याची माहिती मात्र फारच थोड्या लोकांना होती.

करण म्हणाला, “एक महान अभिनेता म्हणून मी नेहमीच अमिताभ बच्चन यांच्याकडे मार्गदर्शनाची अपेक्षा करतो. 1980 आणि 90 च्या दशकात त्यांनी आपलं स्वतंत्र आणि सर्वोच्च स्थान निर्माण केलं आणि आजही ते तितकेच लोकप्रिय आहेत. ‘कृष्णा चली लंडन’ मालिकेतील माझी डॉ. वीरची भूमिका ही एका संतप्त, दुखावलेल्या डॉक्टरची असून त्याच्या भूतकाळातील अन्यायामुळे आज तो कडवट बनला आहे. त्यामुळेच मला जेव्हा या भूमिकेबद्दल माहिती देण्यात आली, तेव्हा माझ्या मनात अमिताभ बच्चन यांच्याशिवाय दुसऱ्या कोणत्याही अभिनेत्याचा विचार आला नव्हता. त्यांची अँग्री यंग मॅनची प्रतिमा आजच्या प्रेक्षकांमध्येही तितकीच लोकप्रिय आहे. ही भूमिका रंगविताना मी त्यांच्या देहबोलीचा, संवादफेकीचा आणि अभिनयाचा विचार डोळ्यापुढे आणतो. तरच मी या व्यक्तिरेखेला पूर्ण न्याय देऊ शकेन. प्रेक्षकांना माझी ही भूमिका टीव्हीवर पाहताना मजा येत असेल, अशी अपेक्षा करतो.”

डॉ. वीर आता लवकरच भारतात परत जात असून त्यानंतर कृष्णाच्या जीवनात अनेक घडामोडी घडणार आहेत. मालिकेचं कथानक पुढे सरकताना प्रेक्षकांना खूपच नाट्यपूर्ण घटना पाहायला मिळतील.

टॅग्स :कृष्णा चली लंडनअमिताभ बच्चन