Join us

तैमूरच्या जन्मानंतर करीना कपूरला ब्रेस्ट फिडिंगसाठी करावा लागला होता 'या' अडचणीचा सामना, तिनेच केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2021 3:58 PM

अभिनेत्री करीना कपूर तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावामुळे चांगलीच चर्चेत आली आहे.

बॉलिवूडची बेबो म्हणजेच अभिनेत्री करीना कपूर तिच्या दुसऱ्या मुलाच्या नावामुळे चांगलीच चर्चेत आली आहे. करीनाने दुसऱ्या मुलाचे नाव जहांगीर ठेवल्यानंतर सोशल मीडियावर करीना आणि सैफ अली खानला चांगलेच ट्रोल केले आहे. करीनाने तिच्या प्रेग्नेंसी बायबल या पुस्तकात मुलाच्या नावाचा खुलासा केला आहे. या पुस्तकामुळे करीना चर्चेत आली आहे. या पुस्तकात तिने दोन्ही गरोदरपणावेळी आलेले अनुभव मांडले आहेत.

या पुस्तकात पहिल्या गरोदरपणाविषयी सांगताना करीनाने तिला तैमूरच्या जन्मानंतर कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला आहे हे सांगितले.

तैमूरच्या जन्मानंतर स्तनपान करताना मोठ्या अडचणी आल्या होत्या, तिने याबद्दल तिने या पुस्तकात सांगितले आहे. या पुस्तकात तिने लिहिले की, तैमूरचा जन्म अचानक सिझिरेयन ऑपरेशनन झाले होते. १४ दिवस माझ्या स्तनांमध्ये दूध तयार झाले नव्हत. माझी आई आणि नर्स सतत काहींना काही प्रयत्न करत होत्या. त्या माझे स्तन वारंवार दाबून पाहायच्या आणि दूध येत नसल्यामुळे चिंताग्रस्त व्हायच्या.

तर या पुस्तकात तिने दुसऱ्या मुलाच्या जन्मानंतर मात्र स्तपान करण्यात कोणत्याच अडचणी आल्या नसल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली की, दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर मला चांगले दूध येत होते. त्यामुळे काही अडचण आली नाही. दुसऱ्या बाळाला स्तनपान करण्याचे मला खरे समाधान मिळाले.

करीना कपूरचा लाडका लेक तैमूर सध्या ४ वर्षांचा आहे. तर २०२१ या वर्षाच्या सुरुवातीलाच करीना दुसऱ्यांचा आई झाली.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान