बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे करीना कपूर खान (kareena kapoor khan). दोन लेकरांची आई असलेल्या करीनाने बॉलिवूडमध्ये झिरो फिगरचा ट्रेंड सुरु केला. त्यामुळे अनेक जण फिटनेसच्या बाबतीत तिला फॉलो करतात. मात्र, सध्या सोशल मीडियावर करीनाचा एक फोटो तुफान व्हायरल होत आहे. करीनाने अलिकडेच इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये तिचे काही फोटो पोस्ट केले होते. विशेष म्हणजे हे फोटो फोटोशॉप करुन एडिट केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
अलिकडेच करीनाने ब्लॅक कलरच्या ड्रेसमध्ये तिचे फोटो पोस्ट केले होते. मात्र, हे फोटो तिने फोटोशॉपच्या मदतीने एडिट केले होते. तिची बारीक दिसण्याची ही ट्रीक चाहत्यांच्या लक्षात आली आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. त्यानंतर करीनाला तिची चूक समजली आणि तिने ते फोटो लगेचच डिलीट केला. ज्यामुळे नेटकऱ्यांमध्ये एकाच चर्चेला उधाण आलं आहे. सोबतच तिच्या फोटोचे स्क्रीनशॉट्सही व्हायरल केले आहेत.
काय म्हणाले ट्रोलर्स?
करीनाने एडीट केलेल्या फोटोमध्ये तिच्या बाजूला असलेल्या दरवाजाची फ्रेम तिरकी झाल्याचं लक्षात येत आहे. हेच पूर्वीच्या फोटोमध्ये ती चौकट व्यवस्थित दिसत होती. यावरुन करीनाने हा फोटो एडीट केल्याचं नेटकऱ्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. 'कंबर बारीक दाखवण्याच्या नादात चूक दिसून आली', असं एका युजरने म्हटलं आहे. तर, 'निदान फोटोशॉप तरी नीट करायचा होता',असं म्हणत नेटकऱ्यांनी तिला ट्रोल केलं आहे.
दरम्यान, करीना लवकरच क्रू या अपकमिंग सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात तिच्यासोबत तब्बू, क्रिती सेनॉन, कपिल शर्मा ही कलाकार मंडळी झळकणार आहेत.