Join us

Kareena Kapoor Tested Corona Positive: करिना कपूर व अमृता अरोरा कोरोना पॉझिटीव्ह, बॉलिवूड पार्ट्या भोवल्या!!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2021 4:30 PM

Kareena Kapoor Khan, Amrita Arora test positive for COVID-19 : करिना व अमृताने गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली होती. या पार्ट्यांमुळे बेबो व अमृता कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर (Kareena Kapoor Khan) आणि तिची जवळची मैत्रिण अमृता अरोरा (Amrita Arora) या दोघींना कोरोनाची लागण झाली आहे. अद्याप करिना वा अमृताने अधिकृतपणे याची माहिती दिलेली नाही. मात्र लवकरच करिना सोशल मीडियावर याबद्दलची अधिकृत माहिती देण्याची शक्यता आहे.एएनआयने याबाबतची माहिती दिली आहे.  बीएमसी सूत्रांकडून ही माहिती समोर आली आहे. बीएमसीने करिना व अमृताच्या संपर्कात येणा-यांना कोरोना चाचणी करण्याचे निर्देश दिले आहेत. (Kareena Kapoor Khan, Amrita Arora test positive for COVID-19)

करिना व अमृताने गेल्या काही दिवसांत अनेक पार्ट्यांना हजेरी लावली.  या पार्ट्यांमुळे बेबो व अमृता कोरोनाच्या सुपरस्प्रेडर ठरण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार मुंबई महापालिकेने यासंदर्भात काँटॅक्ट ट्रेसिंग करण्यास सुरुवात केली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, करिना व अमृता दोघींना कोरोनाची लक्षणं जाणवत असल्याने त्यांनी कोरोनाची चाचणी केली, जी पॉझिटिव्ह आली आहे. करीना कपूर आणि अमृता अरोरा गेल्या काही दिवसांपासून विविध पार्ट्यांमध्ये दिसल्या होत्या.काही दिवसांपूर्वी करिना तिच्या गर्ल गँगसोबत पार्टी करताना दिसली होती. या पार्टीत करिनासोबत तिची बहिण करिश्मा कपूर आणि मलायका अरोरा सहभागी होत्या. अनिल कपूरची लेक रिया कपूरच्या घरी ही पार्टी झाली होती. या पार्टीत करिना आपल्या गर्ल गँगसोबत धम्माल करताना दिसली होती.

अगदी दोन दिवसांपूर्वी करिना, करिश्मा करण जोहरच्या पार्टीत हजर झाल्या होत्या. ‘कभी खुशी कभी गम’ या चित्रपटाला 20 वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने ही पार्टी आयोजित केली गेली होती. पण कदाचित याच पार्ट्या करिना व अमृताला भोवल्या आहेत. करिना व अमृताच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी कोरोना चाचणी केली आहे. त्यांचे रिपोर्ट लवकरच येणार आहेत. यात काही बड्या बॉलिवूड सेलिब्रिटींची नावं असल्याचं कळते.

टॅग्स :करिना कपूरअमृता अरोराकोरोना वायरस बातम्याबॉलिवूड