करिना कपूर लवकरच अंग्रेजी मीडियम सिनेमात दिसणार आहे. 2017मध्ये आलेल्या हिंदी मीडियम सिनेमाचा सीक्वल आहे. ज्यात इरफान खानसोबत करीना कपूर दिसणार आहे. टाईम्स नाऊच्या रिपोर्टनुसार करिना म्हणाली, '' मी इरफान खानची खूप मोठी फॅन आहे आणि आता तो माझा को-स्टार होणार आहे. अंग्रेजी मीडियममध्ये माझी भूमिका खूपच वेगळी आहे. हा एक वेगळा अनुभव असणार आहे. माझी भूमिका यात लहान आहे पण इंटरेस्टिंग आहे. मला माझ्या कंम्फर्ट झोनच्या बाहेरच्या भूमिका करायच्या आहेत.''
अंग्रेजी मीडियम चित्रपटात मिठाई व्यापारी चंपकजीच्या भूमिकेत इरफान दिसणार आहे. अंग्रेजी मीडियम सिनेमाची निर्मिती दिनेश विजान करत असून दिग्दर्शन होमी अदाजानिया करत आहेत. या चित्रपटात इरफानसोबत दीपक डोबरियाल व राधिका मदन मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
२०१७ मध्ये इरफानचा ‘हिंदी मीडियम’ प्रदर्शित झाला होता. यात त्याच्या अपोझिट पाकिस्तानी अभिनेत्री सबा कमर दिसली होती. या चित्रपटाने ३०० कोटींचा बिझनेस करत अनेकांना आश्चयार्ला धक्का दिला होता. चीनमध्येही या चित्रपटाला प्रेक्षकांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे लगेच मेकर्सनी या चित्रपटाचा सीक्वल बनवण्याची तयारी सुरु केली होती.