Join us

अरेरे! सर्व काही परफेक्ट पण..., करिना कपूर सासरच्या या एकाच गोष्टीला वैतागली...!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 04, 2022 4:44 PM

Kareena Kapoor Khan : होय, सगळं काही परफेक्ट असताना एका गोष्टीला मात्र ती जाम वैतागली आहे. आता ही गोष्ट कोणती तर त्याचं उत्तर तुम्हाला बेबोने शेअर केलेल्या फोटोत मिळेल.

Kareena Kapoor Disappointed With Pataudi Family Eid Photo : बॉलिवूडची बेगम अर्थात करिना कपूर (Kareena Kapoor Khan ) या ना त्या कारणानं सतत चर्चेत असते. पण सध्या बेबो वेगळ्याच कारणानं चर्चेत आहे. होय, सगळं काही परफेक्ट असताना एका गोष्टीला मात्र ती जाम वैतागली आहे. आता ही गोष्ट कोणती तर त्याचं उत्तर तुम्हाला बेबोने शेअर केलेल्या फोटोत मिळेल.

काल बेबोच्या सासरी ईद साजरी झाली. दोन्ही नणंदा सोहा व सबा, सोहा चा पती कुणाल खेमू, त्यांची मुलगी, शिवाय सैफ (Saif Ali Khan), जेह, तैमूर आणि बेबो असे सगळे ईदसाठी एकत्र जमले. मग फोटो तर बनता है. हाच फोटो करिनाने सोशल मीडियावर शेअर केला. पण या फोटोला तिने दिलेलं कॅप्शन पाहून सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या.

‘त्या कुटुंबाकडून ईदच्या शुभेच्छा जी सर्वकाही परफेक्ट असतानाही कधीच एक परफेक्ट फोटो काढू शकत नाही....,’असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं. ईदच्या सेलिब्रेशनदरम्यान करिनाला एका परफेक्ट फॅमिली फोटोची अपेक्षा होती. पण ती काही पूर्ण झाली नाही, असंच या कॅप्शनवरून दिसतं. मग काय बेबो जरा निराश झाली.

करिनाने शेअर केलेला फोटो बारकाईनं बघितला तर तुम्हालाही तिच्या निराशेमागचं कारण कळेल. या फोटोत प्रत्येकजण आपआपल्या अंदाजात पोझ देतोय.  करिनाच्या चेह-यावरचा आनंद मिसींग आहे. सैफ हसतोय, पण त्याच्या पुढ्यात बसलेला तैमूर विचित्र पोझ देतोय. इनाया आणि जेह आपल्यात मश्गुल आहेत. कुणाल खेमू जणू स्वत:त हरवला आहे. एकंदर काय तर सगळं काही परफेक्ट आहे पण पोझ परफेक्ट नाही.

 करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर ती लवकरच ‘लाल सिंह चड्ढा’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत अभिनेता आमिर खान मुख्य भूमिकेत आहे.  

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान सोहा अली खानकुणाल खेमूबॉलिवूड