लोकमतच्या रेड कार्पेटवर करीनाचा देसी लूक, मसबा गुप्ताने डिझाइन केलेल्या साडीची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2018 03:40 PM2018-04-11T15:40:50+5:302018-04-11T15:41:48+5:30

अभिनयच नाही तर एक फॅशन आयकॉन म्हणून करीनाने वेगळं स्थान बॉलिवूडमध्ये तयार केलं आहे.

Kareena Kapoor Khan Looks Gorgeous in a Masaba Gupta Saree | लोकमतच्या रेड कार्पेटवर करीनाचा देसी लूक, मसबा गुप्ताने डिझाइन केलेल्या साडीची चर्चा

लोकमतच्या रेड कार्पेटवर करीनाचा देसी लूक, मसबा गुप्ताने डिझाइन केलेल्या साडीची चर्चा

googlenewsNext

मुंबई- रेफ्युजी सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी अभिनेत्री करीना कपूर-खान गेल्या 18 वर्षापासून तिच्या कामाचा ठसा बॉलिवूडमध्ये उमटवते आहे. फक्त अभिनयच नाही तर एक फॅशन आयकॉन म्हणून करीनाने वेगळं स्थान बॉलिवूडमध्ये तयार केलं आहे. कुठलाही गेट अप अगदी सहजपणे करीना सांभाळते. पुरस्कार सोहळ्यांमध्ये, विविध कार्यक्रमात करीनाची स्टाइलिश लूकमधील हजेरी सगळ्यांचंच लक्ष वेधते. करीनाचे कपडे, मेकअप, आत्मविश्वास यासाठी तिचे चाहचे नेहमीच तिला फॉलो करतात. घेरदार गाऊन, पारंपरिक साडी तसंच बिकीनी अशा प्रत्येक प्रकाराच्या कपड्यात करीना धमाका करते. लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर सोहळ्यातही करीनाने दिमाखात एन्ट्री केली. 

 

लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर सोहळ्यात करीनाने पिवळ्या रंगाची साडी परिधान केली होती. मसबा गुप्ताने ही साडी डिझाइन केली होती. करीनाच्या या गेटअपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गडद गुलाबी रंगाचं ब्लाऊज आणि पिवळ्या रंगाची साडी, चेहऱ्यावर हलका मेकअप व काळी टिकली, असा करीनाचा लूक फार उठून दिसत होता. 

लोकमत महाराष्ट्रीय ऑफ द इयर पुरस्कार सोहळ्यात करीनाला पॉवरफुल आयकॉन पुरस्काराने गौरविण्यात आलं. या कार्यक्रमात करीनाची खास मुलाखत पार पडली. करिनानं मनमोकळा संवाद साधत अनेक प्रश्नांना दिलखुलासपणे उत्तरं दिली.

Web Title: Kareena Kapoor Khan Looks Gorgeous in a Masaba Gupta Saree

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.