‘दबंग 2’मधील आपल्या स्पेशल डान्स नंबरने सगळ्यांना वेड लावणारी करिना कपूर आता ‘दबंग 3’साठी सज्ज झाली आहे. होय,‘दबंग 2’ मधील ‘फेव्हिकोल से’ हे करिनावर चित्रीत आयटम साँग प्रचंड गाजले. आता ‘दबंग 3’मध्येही करिना अशाच एका धम्माल गाण्यावर थिरकताना दिसणार आहे. प्रभू देवा या आयटम साँगची कोरिओग्राफी करणार आहे.रोहित शेट्टीला भेटल्यानंतर करिना अरबाज खानला भेटायला पोहोचली आहे. तुम्हाला ठाऊक आहेच की, अरबाज हा ‘दबंग’सीरिजचा निर्माता आहे. ‘दबंग’मध्ये मलायका अरोरा हिने ‘मुन्नी बदनाम हुई’ हे आयटम साँग केले होते. तर ‘दबंग 2’मध्ये करिनाचे ‘फेविकॉल से’ हे आयटम साँग होते. ‘दबंग 3’मध्ये अशाच एका आयटम साँगसाठी करिना हीच अरबाजची पहिली पसंत असल्याचे कळतेय. करिना व अरबाजची ताजी भेट याचसाठी होती, असे कळतेय.
‘दबंग 3’मध्ये थिरकणार ‘फेव्हिकोल से’ गर्ल करिना कपूर!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 03, 2019 1:13 PM