Join us

सैफअली खानसह शेतात काम करतानाचा दिसला तैमूर, आत्तापर्यंतचा आहे सर्वात खास फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2021 11:45 AM

तैमूरदेखील सैफअलीखानसह मोठ्या आनंदाने शेतात काम करताना दिसतोय.तस दुस्-या एका फोटो तो चक्क झाडावर बसत गंमत बघतोय.

करिना कपूरने सैफअली खान आणि तैमूरचा एक खास फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.सैफअली खान तैमूरचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला.या फोटोला चाहत्यांचीही प्रचंड पसंती मिळाली. हा फोटो शेअर करण्यामागेही एक खास कारण होते.जागतिक पर्यावरण दिवसाच्या निमित्ताने हा फोटो करिनाने शेअर केला होता.करिनाने फक्त फोटोच शेअर केले नाही तर ‘झाडे वाढवा, पर्यावरण वाचवा’ असेही कॅप्शन दिले आहे.अधिक झाडे लावा आणि पर्यावरण वाचवा अशा आशयाची कॅप्शन तिने दिली आहे.

 

 

तैमूरदेखील सैफअलीखानसह मोठ्या आनंदाने शेतात काम करताना दिसतोय.तस दुस्-या एका फोटो तो चक्क झाडावर बसत गंमत बघतोय. त्यामुळे तैमूरचा हा फोटो इंटरनेटवर सर्वाधिक खास फोटो ठरतोय. या फोटोला नेहमीप्रमाणे चाहत्यांकडून भरभरुन लाईक्स आणि कमेंट्स मिळत असल्याचे पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा तैमूरने त्याच्या खास अंदाजात चाहत्यांची मनं जिंकली आहेत हे मात्र नक्की.

करिना सैफ आपल्या लाडक्या लेकाचे हट्ट पुरवण्यासाठी सगळ्याच गोष्टी करतात. दिलेल्या मुलाखतीत करिनाने तैमूरविषयी सांगितले होते की, मुलांना तुमच्या आयुष्यात स्थान देणं गरजेचं असतं. त्यांना तुमच्या जीवनात सामावून घ्या.

तैमूर माझ्यात आणि सैफमध्ये गुंतला आहे. आम्ही कुठेही जात असलो तरी तो आमच्यासोबत असतो. मी किंवा सैफ शूटिंगला जात असलो तरी तो सोबत असतो. सात महिन्यांचा असल्यापासून तो आमच्यासोबत प्रवास करतो. आमच्या जीवनशैलीसह त्यानं जुळवून घेणं गरजेचं आहे. त्यामुळे तैमूरने कोणत्या गोष्टी कराव्यात कोणत्या करु नये याची समज त्याला लहानपणापासूनच याची नेहमीच करिना काळजी घेत असते.

घरातही खेळीमेळीचं वातावरण कसे निर्माण करता येईल यावर करिनाचा भर असतो. घरातलं किचन तैमूर आणि सैफला खूप आवडतं. त्यामुळे ते सतत किचनमध्ये वेळ घालवतात. वेगवेगळे पदार्थ बनवतात. त्यामुळे किचन डिपार्टमेंट त्यांचे आहे.म्युझिक डिपार्टमेंट मात्र मी सांभाळते. सैफ व तैमूरला दोघांनाही जॅझ म्युझिक आवडते. त्यांची ही आवड मी पूर्ण करते, असे करिनाने हसत हसत सांगितले. 

 

 

टॅग्स :करिना कपूरतैमुर