आपल्या लाडक्या कलाकारांबद्दल जाणून घेण्याची प्रत्येक फॅनची इच्छा असते. चित्रपटांसह त्यांचं खासगी जीवन, त्यांच्या जीवनात घडणाऱ्या घडामोडी, राहणीमान इत्यादी गोष्टींची फॅन्सना उत्सुकता असते.'बंटी और बबली 2' या सिनेमामुळे सैफ अली खान सध्या चर्चेत आहे. सिनेमाचे प्रमोशन करण्यात तो सध्या व्यस्त आहे.
सिनेमासोबतच त्याच्या खासगी आयुष्यात घडलेले अनेक किस्सेही समोर येत असतात. स्वतः दिलेल्या काही मुलाखतीत सैफ अली खान असे काही किस्से सांगतो की जे ऐकून चाहतेही आश्चर्य व्यक्त करतात. नुकतेच सिनेमाची टीम कपिल शर्माच्या शोमध्ये पोहचली होती. या शोमध्ये सैफने त्याच्या खासगी आयुष्यात घडलेले मजेशीर किस्से सांगितले. यापैकीच एक किस्सा सध्या प्रचंड चर्चेत आहे.
सैफ अली खान आणि करीना कपूर खान आता त्यांच्या वांद्रे येथील नवीन घरात शिफ्ट झाले आहेत. दुसऱ्या बाळाच्या जन्माआधीच दोघेही नवीन घरात शिफ्ट झाले. यापूर्वी दोघेही फॉर्च्युन हाईट्स अपार्टमेंटमध्ये राहत होते.पण हे घर त्यांना छोटे पडत होते. त्याच कारणुळे सैफीनाने नवीन घरात शिफ्ट होण्याचा निर्णय घेतला होता.
नवीन घरातलाच एक किस्सा सैफने सांगितला.एकदा अचानक एक अनोळखी महिला त्यांच्या घरी आली होती. तिने दाराची बेल वाजवली तेव्हा नेमकं सैफने दार उघडले. त्या महिलेला सैफ आणि करिना दोघेही ओळखत नसल्यामुळे नेमकी ती कशासाठी आली ? आहे तरी कोण ? अशाच दृष्टीने बघत होते. महिलेने चांगले कपडे घातले होते. त्यामुळे तिला बिल्डींगमध्ये येण्यासही कोणी रोखले नसावे. महिलेने सैफला पाहताच 'अच्छा तू इथे राहतोस ?' असाच प्रश्न विचारला. नेमकी त्या दिवशी करिना घरीच होती. ती महिला थेट घरातच घुसली. त्यामुळे सैफही अतिशय घाबरला होता. पण तरी थोडी हिंमत करुन सैफने महिलेला त्याच्या घरी येण्याचे कारण विचारले. काहीही न बोलता ती निघून गेली. तेव्हा कुठे सैफच्या जीवात जीव आला. पण सैफ आणि करिना दोघेही काही वेळ त्या महिलेविषयीच विचार करत होते.