Join us

करिना कपूरचा खुलासा, म्हणाली- 'अक्षय कुमारने सैफ अली खानला माझ्याविरुद्ध भडकवले'

By ऑनलाइन लोकमत | Published: February 01, 2022 5:55 PM

करिना कपूर  (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan)  यांनी एकत्र 'टशन'(Tashan) चित्रपट काम केलं होतं.

करिना कपूर  (Kareena Kapoor) आणि सैफ अली खान(Saif Ali Khan)  यांनी एकत्र 'टशन'(Tashan) चित्रपट काम केलं होतं. 2008 मध्ये या चित्रपटाच्या सेटवर बेबो आणि सैफच्या लव्हस्टोरीला सुरुवात झाली होती. 'टशन'मध्ये सैफ-करीनासोबत अक्षय कुमार(Akshay Kumar)ही होता. सैफचा करीनाकडे असलेला कल पाहून अक्षयने तिला असे न करण्याचा सल्ला दिला. मात्र, सैफने चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान प्रपोज केलं होतं आणि अखेर दोघांनी 2012 मध्ये लग्न केले.

करिना कपूर खानने खुलासा केलाअक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्नासोबतच्या चॅट शोमध्ये करिना कपूर खानने हा मजेदार खुलासा केला आहे. बॉलिवूड अभिनेत्री ट्विंकल आता लेखिका बनली आहे, करिना कपूर खानशी तिच्या ट्वीक इंडिया (Tweak India) च्या प्लॅटफॉर्मवर बोलत होती, त्यादरम्यान करिनाने ट्विंकलला सांगितले की, 'टशन चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अक्षयला जाणवले की सैफ तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करत आहे, अशा वेळी त्याने इशारा दिला होता.

अक्षय कुमारने सैफ अलीला दिला सल्लाकरिना कपूर सांगते की, एके दिवशी अक्षय सैफला कोपऱ्यात घेऊन गेला आणि म्हणाला की, काळजी घे कारण खतरनाक मुली आहेत. ही एक डेन्जर फॅमिली आहे आणि मी त्यांना ओळखतो. करिनाने सांगितले की, यावर सैफ म्हणाला होता की, नाही-नाही, मला माहीत आहे, मी ते संभाळून घेईन.

करिना कपूरने एकदा एका मुलाखतीत सांगितले होते की, जेव्हा ती 'टशन'च्या सेटवर सैफ अली खानला भेटली तेव्हा ती प्रेमात पडली होती. त्यावेळी मी माझ्या करिअरमध्ये विशेष काही करत नव्हते. मी त्याला याआधीही भेटलो होतो पण 'टशन'च्या शूटिंगदरम्यान खूप काही बदलले होते. त्याची स्टाईल बघून मी  फिदा झाले. मला आठवतंय की लडाख आणि जैसलमेरमध्ये शूटिंग करताना आम्ही लॉन्ग बाइक राइडवर जायचो.

टॅग्स :करिना कपूरसैफ अली खान अक्षय कुमारट्विंकल खन्ना