ठळक मुद्दे‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर करिना व सैफ यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती.
सैफ अली खान व करिना कपूर बॉलिवूडचे परफेक्ट कपल आहे. कालच करिनाचा वाढदिवस झाला. सैफसह संपूर्ण कुटुंबीयांनी पतौडी पॅलेसमध्ये करिनाचा वाढदिवस साजरा केला. सैफिनाच्या लग्नाला 7 वर्षे झाली आहेत. पण आजही सैफची एक सवय पाहून करिना वैतागते. होय, एका शोमध्ये करिनाने स्वत: याबद्दल खुलासा केला.
नुकतीच करिनाने एका टॉक शोमध्ये हजेरी लावली. संध्याकाळचा वेळ तू व सैफ कसा घालवता? असा एक प्रश्न करिनाला यावेळी विचारण्यात आला. यावर करिनाने अगदी मनमोकळे उत्तर दिले. मी आणि सैफ दोघेही सोशल आहोत. पण तरीही फिल्मी पार्ट्या आम्हा दोघांना आवडत नाहीत. सैफ चित्रपटांच्या स्क्रिनिंगला जात नाही. मी खोटे बोलू शकत नाही, असे त्याचे म्हणणे आहे. त्यामुळे तो स्क्रिनिंग शोपासून चार हात लांब राहतो. आम्ही दोघेही फिल्मी दुनियेतील आहोत. पण फिल्मी दुनियेतील फार कमी लोक आमचे मित्र आहेत. सैफला वाचनाची प्रचंड आवड आहे. तो संध्याकाळी वाचनात मग्न असतो, असे करिनाने सांगितले.
तिने पुढे सांगितले की, आम्ही 7.30 ते 8 या दरम्यान डिनर करतो. सैफसोबत कुठलीही गोष्ट विचारली की, त्याची पहिली प्रतिक्रिया ‘नाही’ अशीच असते. मी अनेकदा चिडते. तू प्रत्येक गोष्ट ट्राय करून मगच निर्णय घेणार का? असे विचारले की, त्यावरही ‘नाही’ असेच त्याचे उत्तर असते. मग अचानक दोन-तीन तासांनंतर तो मला मॅसेज करून ‘हो’ म्हणतो. ‘हो’ म्हणायचेच होते तर आधी ‘नाही’ का म्हटले, असा प्रश्न मला पडतो. माझ्यामते, तो उगाच ‘नाही’ म्हणतो.
‘टशन’ या चित्रपटाच्या सेटवर करिना व सैफ यांची लव्हस्टोरी सुरु झाली होती. 2012 मध्ये दोघांनीही लग्न केले. सैफ हा करिनापेक्षा 10 वर्षांनी मोठा आहे.