Join us

करिनाच्या 'द बकिंगघम मर्डर्स'चा फर्स्ट लुक आऊट, २३ वर्षात पहिल्यांदाच साकारतेय अशी भूमिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2023 14:53 IST

'द बकिंघम मर्डर्स'च्या फर्स्ट लुकमध्ये करिना पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे.

दिग्दर्शक हंसल मेहतांचा आगामी सिनेमा 'द बकिंघम मर्डर्स' (The buckingham Murders) चा फर्स्ट लुक समोर आला आहे. यामध्ये अभिनेत्री करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे. तिने सिनेमात गुप्तहेराची भूमिका साकारली आहे. पहिल्यांदाच ती अशी भूमिका साकारत असल्याने फारच उत्साहित आहे. जस भामरा असं तिच्या व्यक्तिरेखेचं नाव आहे. रविवारी 'BFI लंडन फिल्म फेस्टिव्हल 2023' मध्ये या सिनेमाला स्टँडिंग ओवेशन मिळालं. 

'द बकिंघम मर्डर्स'च्या फर्स्ट लुकमध्ये करिना पोलिसांच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न करत आहे. तसंच तिच्या चेहऱ्यावर प्रचंड राग आहे. या पोस्टरने सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी ताणली आहे. मेकर्सने अद्याप सिनेमाची रिलीज डेट जाहीर केलेली नाही. मात्र लवकरच नेटफ्लिक्सवर सिनेमा रिलीज होणार आहे.

हा सिनेमा स्वत: करिना कपूर निर्मित करत आहे. तिच्यासोबत ऐश टंडन, रणवीर बरार आणि कीथ एलन यांचीही भूमिका आहे. हंसल मेहतांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे . तर असीम अरोरा, कश्यप कपूर आणि राघव राज यांनी सिनेमाची कहाणी लिहिली आहे. शोभा कपूर, एकता कपूर आणि करिना कपूर यांनी मिळून सिनेमा प्रोड्युस केला आहे. 

करिना कपूरने सिनेमात जस भामरा उर्फ जैस या भूमिकेत आहे. जैस ही एक गुप्तहेर आहे. पण त्याआधी ती एक आईही आहे जिने आपल्या मुलाला गमावलं आहे. ब्रिटनच्या बकिंगघमशायर मध्ये एका १० वर्षीय मुलाची हत्या होते. याची चौकशी जैसच्या खांद्यावर येते. गोष्ट जशी जशी पुढे जाते, नवीन रहस्य उलगडत जातात. शहरातील जवळपास प्रत्येक माणूस संशयाखाली असतो. ही केस सोडवत असतानाच जैसला तिच्या मुलाचीही आठवण येत असते त्यामुळे ही केस तिच्यासाठी भावनिक होऊन जाते.

२३ वर्षांपासून करिनाला होती प्रतिक्षा 

करिनासाठी हा सिनेमा खास आहे कारण तिने २३ वर्षांच्या तिच्या करिअरमध्ये अशी भूमिका साकारलेली नाही.  ती नेहमीच गुप्तहेराच्या जॉनर ची चाहती राहिली आहे. मी याच भूमिकेच्या शोधात होते असंही ती म्हणाली. 

टॅग्स :करिना कपूरहंसल मेहताबॉलिवूडसिनेमा