Join us

करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉनचा 'क्रू' पाहा फक्त 150 रुपयांत! कधी, कुठे आणि कसं? जाणून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 17, 2024 14:33 IST

'क्रू' हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेनॉन सध्या त्यांच्या 'क्रू' या सिनेमामुळे चर्चेत आहे.  हा सिनेमा नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या कॉमेडी ड्रामा चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पहिल्या दिवसापासूनच या सिनेमाचे शो हाऊसफूल होत आहेत. करीना-तबू-क्रितीचं हे त्रिकुट प्रेक्षकांच्या भलतचं पसंतीस उतरलं आहे. 'क्रू' हा कॉमेडी सिनेमा प्रेक्षकांचं पूरेपूर मनोरंजन करताना दिसत आहे. आता हा सिनेमा फक्त 150 रुपयांत पाहता येणार आहे. कधी, कुठे आणि कसं? याबाबत जाणून घेऊया.

'क्रू' सिनेमा थिएटरमध्ये पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांसाठी 'Crew Zing Offer' ही एक भन्नाट ऑफर देण्यात आली आहे. निर्मात्यांकडून 'क्रू' सिनेमाचं तिकीट केवळ 150 रुपयांमध्ये मिळणार आहे. याबाबत एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे. 'क्रू'च्या निर्मात्यांनी अधिकृतपणे जाहीर केलं आहे की कोणत्याही सिनेमा हॉलमध्ये 'क्रू' चित्रपटाची तिकिट किंमत 150 रुपये असेल.   

चित्रपटाची दमदार कथा आणि अभिनय यामुळे प्रेक्षक या चित्रपटाचे कौतुक करत आहेत. तब्बू, करीना आणि क्रिती व्यतिरिक्त यात दिलजीत दोसांझ आणि कपिल शर्मा देखील दिसत आहेत. या चित्रपटात तिन्ही अभिनेत्री एअर होस्टेसच्या भूमिकेत आहेत. तिघेही काम करणाऱ्या विमान कंपनीच्या दिवाळखोरीमुळे त्यांना सहा महिन्यांपासून पगार मिळत नाही, त्यामुळे त्यांना आर्थिक संकटाला सामोरे जावे लागत आहे. तिन्ही कारभाऱ्यांनी मिळून गैरकृत्य करण्याचा प्रयत्न केला आणि इथून कथेला नवे वळण मिळते. 

टॅग्स :करिना कपूरसेलिब्रिटीबॉलिवूडक्रिती सनॉनतब्बू