Join us

'जाने जान' मध्ये करिनाचा ग्लॅमरस लुक, बॉलिवूडची 'बेबो' ओटीटीवर पदार्पणासाठी सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2023 3:14 PM

'लाल सिंग चड्डा' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर करीनाच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सर्वांचंच लक्ष होतं.

बेबो करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan) ओटीटीवर पदार्पण करत आहे. सुजॉय घोष यांच्या 'जाने जान' (Jaane Jaan) या सिनेमात करीना मुख्य भूमिकेत असून नुकताच टीझर रिलीज करण्यात आला आहे. नेटफ्लिक्स (Netflix) या ओटीटी प्लॅटफॉर्मवर सिनेमा प्रदर्शित होतोय. विजय वर्मा (Vijay Varma) आणि जयदीप पहलावत (Jaideep Pahlawat) यांचीही सिनेमात मुख्य भूमिका आहे. करीनाच्या ओटीटी पदार्पणासाठी चाहते उत्सुक आहेत. 

'लाल सिंग चड्डा' सिनेमा फ्लॉप झाल्यानंतर करीनाच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे सर्वांचंच लक्ष होतं. अनेकदा तिच्या सोशल मीडियावरुन शूटिंग करतानाची झलक दिसायची. आता बॉलिवूडची बेबो ओटीटीवर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. 'जाने जान' सिनेमाचा टीझर पाहून तर उत्सुकता आणखी ताणली आहे. नेहमीप्रमाणे करीना ग्लॅमरस दिसत आहे. 

टीझर पाहून गोष्टीचा अंदाज लावणं तसं अवघड आहे. टीझरची सुरुवातीलाच करीना ' आ जाने जान'हे गाणं गाताना दिसते. जयदीप पहलावत अगदी वेगळ्या लुकमध्ये दिसतोय. त्याला ओळखणंही कठीण आहे. तर विजय वर्मा पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसण्याची शक्यता आहे. सुजॉय घोष यांनी सिनेमा दिग्दर्शित केला आहे. २१ सप्टेंबर या दिवशी करीनाचा वाढदिवस असतो. या दिवशीच 'जाने जान' नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.

टॅग्स :करिना कपूरनेटफ्लिक्सबॉलिवूडसिनेमा