Join us

मेरा जूता है जापानी! आजोबा राज कपूर यांना नातीकडून ट्रिब्यूट, करीना कपूरचा दमदार परफॉर्मन्स

By ऋचा वझे | Updated: March 10, 2025 12:07 IST

IIFA 2025: करीनाच्या परफॉर्मन्सचं नेटकऱ्यांकडून भरभरुन कौतुक

IIFA 2025: राजस्थानमधील जयपूर येथे नुकतंच आयफा डिजिटल(IIFA) पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. 'पंचायत','कोटा फॅक्टरी' सारख्या अनेक सीरिजवर पुरस्कारांचा पाऊस पडला. या सोहळ्यात  शाहरुख खान, माधुरी दीक्षित, करीना कपूर, करण जोहर, कार्तिक आर्यन, शाहिद कपूर, क्रिती सेनसह अनेक बॉलिवूड कलाकार यांच्या उपस्थितीनेही शान वाढवली. यावेळी करीना कपूरने आजोबा राज कपूर यांच्या सुपरहिट गाण्यांवर डान्स करत त्यांना ट्रिब्यूट दिलं.

अभिनेते राज कपूर यांची वेगळी स्टाईल होती. 'मेरा जूता है जापानी','प्यार हुआ इकरार हुआ' यांसारख्या सदाबहार गाण्यांवर डान्स करत करीना कपूरने आजोबांना ट्रिब्युट दिलं. तिने अगदी राज कपूर यांच्यासारखाच पेहराव केला होता. तेच हावभाव करत तिने दमदार परफॉर्मन्स दिला. राज कपूर यांच्या नातीनेच त्यांना अशा प्रकारे ट्रिब्यूट देणं यापेक्षा शानदार ते काय! करीनाच्या या परफॉर्मन्सवर नेटकऱ्यांनीही तिचं कौतुक केलं आहे.

बेबोच्या परफॉर्मन्स आणि एक्सप्रेशन्सवर नेटकरी फिदा झालेत. 'राज कपूर यांच्या सर्वोत्कृष्ट वारशाकडून त्यांना ट्रिब्यूट','करीना आणि रणबीर कपूर राज कपूर यांचा वारसा पुढे घेऊन जात आहेत','करीनाचा परफॉर्मन्स पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत','मस्त एक्सप्रेशन्स, डोळेही किती बोलके आहेत' अशा शब्दात नेटकऱ्यांनी करीनावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

टॅग्स :आयफा अॅवॉर्डजयपूरकरिना कपूरराज कपूरनृत्यबॉलिवूड