Join us

करीना कपूरचा अनारकली सूट तयार करायला लागले तब्बल एवढे कारागीर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2024 6:48 PM

बॉलिवूडची बेबो अर्थात करीना कपूर सध्या तिच्या नव्या आऊटफिटमुळे चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री करीना कपूर खान तिच्या प्रोफेशनल लाईफसोबतच तिच्या स्टाइलसाठीही ओळखली जाते. अभिनेत्रीचे चाहतेही तिचा लूक अनेकदा कॉपी करतात. अलीकडेच करीना पारंपारिक लूकमध्ये दिसली होती आणि तिचा हा लूक खूप पसंत केला जात आहे. करिनाचा अनारकली सूट सध्या चर्चेत आला असून तो डिझाइन करायला कारागिरांनी फार मेहनत घेतली. बेबोचा अनारकली सूट सध्या ट्रेण्डमध्ये आलायं. 

नुकतेच 20 फेब्रुवारी रोजी मुंबईत दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल अवॉर्ड्समध्ये करीना कपूर सहभागी झाली होती. यावेळी तिनं सर्वांच लक्ष वेधून घेतलं.  बऱ्याच दिवसांनी करीना एका अवॉर्ड शोमध्ये दिसली. यावेळी अभिनेत्रीने डीप नेक ऑफ शोल्डर बेज रंगाचा अनारकली सूट परिधान केला होता.  बेबोने पुन्हा एकदा तिच्या लूकने लोकांची मने जिंकली. या अनारकली सुटची खास गोष्ट म्हणजे 100 कारागिरांनी स्वत: च्या हातांनी मिळून हा सूट तयार केला आहे. 

दादासाहेब फाळके इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये प्रसिद्ध डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांच्या कलेक्शनमधला हा सूट आहे.  आता डिझायनरने या सूटची सर्व माहिती फोटोसह सोशल मीडियावर शेअर केली आहे.  या ड्रेसवर १,१०,००० आरशांची नाजूक नक्षी केली आहे. या ड्रेसला लांब स्लिव्ह्स आणि व्ही नेकलाइन देण्यात आली आहे. करीना कपूरने या आउटफिटला मॅच करण्यासाठी ज्वेलरी घातली होती. पांढरे मोती असलेल्या अंगठीनं तिचं सौंदर्य वाढवलं.  करिनाने हा अनारकली सूट स्टायलिश पद्धतीने रेड कार्पेटवर कॅरी केला. 

करीना कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाल्यास, तिनं गेल्या वर्षी ओटीटीवर पदार्पण केले होते. तिचा जाने जान हा चित्रपट लोकांना खूप आवडला. करिनाचे ओटीटी पदार्पण धमाकेदार होतं. यासोबत रोहित शेट्टीच्या आगामी 'सिंघम अगेन' चित्रपटात करीना झळकणार आहे. या चित्रपटामध्ये अजय देवगण, अक्षय कुमार आणि रणवीर सिंग हे मुख्य भूमिकेमध्ये दिसणार आहेत.

टॅग्स :करिना कपूरसेलिब्रिटीबॉलिवूड