Join us

करीना कपूरचा हा चित्रपट आहे लोकप्रिय, IMDb वर सर्वाधीक रेटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 21, 2023 5:10 PM

Kareena Kapoor : करीना कपूर खानने 2000 साली रिलीज झालेला चित्रपट रेफ्युजीद्वारे स्क्रीनवर पदार्पण केले व त्यामध्ये तिला सर्वोत्तम महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता.

करीना कपूर खान(Kareena Kapoor Khan)ने 2000 साली रिलीज झालेला चित्रपट रेफ्युजीद्वारे स्क्रीनवर पदार्पण केले व त्यामध्ये तिला सर्वोत्तम महिला पदार्पणासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर तिने बॉक्स ऑफीसवर हिट झालेल्या अनेक चित्रपटांमध्ये भूमिका केल्या ज्यामध्ये चमेली, अशोका, जब वी मेट, 3 इडियटस, बजरंगी भाईजान आणि इतर अनेक भूमिकांचा समावेश होता. 2012 मध्ये तिने तलाश चित्रपटातील सह कलाकार सैफ अली खानसोबत लग्न केले. सुजॉय घोष दिग्दर्शित जाने जान या नेटफ्लिक्स ओरिजिनलद्वारे ती लवकरच ओटीटीवर पदार्पण करणार आहे 

IMDbवरील करीना कपूर खानचे सर्वोच्च रेटींग असलेले टॉप 10 चित्रपट असे आहेत

1)    ३ इडियटस – 8.42)    बजरंगी भाईजान – 8.13)    ओंकारा – 8.04)    जब वी मेट – 7.95)    उडता पंजाब – 7.76)    कभी ख़ुशी कभी ग़म... – 7.47)    युवा- 7.38)    तलाश – 7.29)    अंग्रेजी मीडियम – 7.210)   हलचल - 7.0

करीना कपूरने पतौडी पॅलेसमध्ये वाढदिवस केला साजरा अभिनेत्री करीना कपूर खानने पतौडी पॅलेसमध्ये तिचा ४३ वा वाढदिवस साजरा केला. अभिनेत्रीच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनची झलक सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली आहे. अभिनेत्री करिश्मा कपूरने तिची बहीण करीना कपूर खानच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली होती. ज्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे.

टॅग्स :करिना कपूर