नव्वदच्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर (Karishma Kapoor) बऱ्याच मोठ्या कालावधीपासून सिनेइंडस्ट्रीपासून दुरावली आहे. तिने तिच्या कारकीर्दीत एकापेक्षा एक दमदार सिनेमे दिले आहेत. आजही तिच्या अभिनय आणि सौंदर्यावर लोक फिदा आहेत. अजय देवगण (Ajay Devgan) आणि करिश्मा कपूर एकेकाळी एकमेकांसोबत रिलेशनशीपमध्ये होते. दोघांनी १९९२ मध्ये आलेल्या 'जिगर' चित्रपटात एकत्र काम केले होते. हा चित्रपट आणि करिश्मा-अजयची जोडी जबरदस्त हिट ठरली होती.
जिगर या चित्रपटानंतर करिश्मा आणि अजयने सलग ४ चित्रपटात एकत्र काम केले. ज्यामध्ये त्याने 'संग्राम', 'शक्तिमान', 'धनवान' आणि 'सुहाग'मध्ये आपले टॅलेंट दाखवले. हे सर्व चित्रपट बॉक्स ऑफिसवरही यशस्वी ठरले. मात्र, सुहाग चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर ते दोघे कायमचे वेगळे झाले. खरंतर चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते एकमेकांच्या जवळ आले होते. पण काही कारणास्तव चित्रपट प्रदर्शित होताच त्यांचे नाते तुटले.
या अभिनेत्रीमुळे अजय-करिश्माच्या नात्यात आला दुरावा
IMDb च्या रिपोर्टनुसार, करिश्मा-अजयची जोडी १९९७ मध्ये आलेल्या 'इश्क में' चित्रपटात दिसणार होती. मात्र चित्रपटात तिच्या अपोझिट अजयचे नाव ऐकल्यानंतर करिश्माने नकार दिला. याचं कारण होतं अभिनेत्री मनीषा कोईराला. मनीषा कोईरालामुळे करिश्मा आणि अजयचे नाते तुटल्याचे बोलले जाते. कारण करिश्मापासून वेगळे झाल्यानंतर अजयचे नाव मनीषासोबत जोडले गेले. याच कारणामुळे करिश्माला अजयसोबत कोणताही चित्रपट करायचा नव्हता.
अजयने काजोलशी केलं लग्न
पुढे इश्क या चित्रपटात अजयची काजोलसोबत जोडी जमली आणि हळूहळू दोघेही रिलेशनशीपमध्ये आले. अजयने काजोलशी लग्न केले आणि करिश्माने तिचा बालपणीचा मित्र संजय कपूरला जोडीदार म्हणून निवडले पण काही वर्षांनी दोघांचा घटस्फोट झाला.