Join us

Karisma Kapoor Birthday : करिश्मा कपूरच्या या गोष्टी तुम्हाला माहीत आहेत का? 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2018 11:14 AM

25 जून 1974 मध्ये करिश्मा जन्म कपूर खानदानात झाला. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबाबतच्या खास गोष्टी जाणून घेऊ....

मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री करिश्मा कपूर आज भलेही रुपेरी पडदयापासून दूर असली तरी आजही तिचे लाखों चाहते आहेत. एक काळ तिने आपल्या अदाकारीने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. आज याच करिश्मा कपूरचा वाढदिवस आहे. 25 जून 1974 मध्ये करिश्मा जन्म कपूर खानदानात झाला. आज तिच्या वाढदिवसानिमित्त तिच्याबाबतच्या खास गोष्टी जाणून घेऊ....

1) कपूर खानदानातील महिला कधीही सिनेमात काम करत नाही. शशी कपूर यांची मुलगी संजना कपूरने ही परंपरा तोडली होती. पण तिला फार यश मिळालं नाही. त्यामुळे ही परंपरा तोडण्याचा मान खऱ्या अर्थाने करिश्माला मिळतो.

2) करिश्माला लोलो म्हणून घरी हाक मारली जाते. करिश्माच्या आजीचं नाव गिना लोलोब्रिगाडा असं होतं. त्यातील लोलो हे नाव करिश्माची आई बबीताने तिला दिलं. 

3) करिश्माला बॉबी देओलसोबत लॉन्च करण्याचा प्लॅन केला जात होता. पण बॉबीच्या सिनेमाचं काम सुरु व्हायला वेळ लागणार होता. त्यामुळे करिश्माने 1991 मध्ये प्रेम कैदी सिनेमापासून करिअरला सुरुवात केली. 

4) करिश्माने बॉलिवूडमध्ये एन्ट्री घेतली तेव्हा तिची फार खिल्ली उडवली गेली. तिला सुरुवातील लेडी रणधीर कपूर म्हणून चिडवले गेले. त्यासोबतच तू पुरुषांसारखी दिसते असेही तिला हिणवले गेले. 

5) करिश्मा कपूरचा दुसरा सिनेमा 'पोलिस ऑफिसर' हा होता. या सिनेमात ती जॅकी श्रॉफची हिरोईन होती. हा सिनेमा पाहिल्यावर ऋषी कपूर यांनी प्रतिक्रिया दिली होती की, जॅकी श्रॉफ हा करिश्माचा काका वाटतो.  

6) राजा हिंदुस्थानी हा करिश्माच्या करिअरमधील सर्वात हिट सिनेमा ठरला. आधी हा सिनेमा ऐश्वर्या राय करणार होती. पण नंतर करिश्माला हा सिनेमा मिळाला. या सिनेमातील तिची किसींग सीन फारच गाजला होता. 

7) डेविड धवन करिश्माला त्याच्यासाठी भाग्यवान मानतो. त्यामुळे ती डेविडच्या राजा बाबू, अंदाज, कुली नं 1, जुड़वा, हिरो नं. 1, बीवी नं 1, हसीना मान जाएगी, दुल्हन हम ले जाएंगे, चल मेरे भाई यांसारख्या सिनेमामध्ये दिसली. 

8) दिल तो पागल है सिनेमात शाहरुख खान आणि माधुरी दीक्षित यांच्या तुलनेत लहान भूमिका असूनही तिने या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रा राष्ट्रीय पुरस्कार मिळवला. 

9) करिश्मा कपूरचं नाव अजय देवगनसोबत जोडलं गेलं होतं. पण असेही म्हटले जाते की, करिश्मा अजय आणि रवीनाच्या अफेअरमध्ये आली होती. 

10) 2002 मध्ये करिश्मा कपूरचा साखरपुडा अभिषेक बच्चनसोबत झाला होता. पण काही महिन्यातच हे लग्न मोडलं. 

11) असे म्हटले जाते की, करिश्माच्या आईने अभिषेकला त्याची कमाई विचारली होती. त्यामुळे बच्चन परिवारातील लोक नाराज झाले होते. 

टॅग्स :करिश्मा कपूरबॉलिवूड