कार्तिक आर्यन आणि छोटे नबाव सैफ अली खानची लेक अभिनेत्री सारा अली खानच्या अफेअरच्या चर्चा रंगल्यात. इम्तियाज अलीचा सिनेमा 'लव्ह आज कल २'च्या सेटवर दोघांच्या बॉन्डिंग विषयीच्या चर्चा ऐकायला मिळायच्या. आता शूटिंग संपल्यानंतरही हे दोघे एकमेकांच्या संपर्कात आहेत. त्या दोघांचे अनेक फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहेत.
सारा आणि कार्तिकच्या अफेअरची चर्चा सुरू असताना आता साराच्या आईला कार्तिक आवडत असल्याचे म्हटले जात आहे. साराचा भाऊ इब्राहिम आणि आई अमृता सिंग यांच्यासोबत कार्तिकची बॉण्डिंग खूप चांगली असल्याची चर्चा सध्या रंगली आहे. बॉलिवूड लाइफने दिलेल्या बातमीनुसार, लव्ह आज कल २ या चित्रपटाचे चित्रीकरण हिमाचल प्रदेश येथे सुरू होते.
सारा ही आपल्या आईशी खूपच क्लोज असल्याने ती तिच्या आईला प्रचंड मिस करत होती आणि त्यामुळे ती चित्रीकरणातून फ्री झाल्यानंतर तिच्या आईसोबत व्हिडिओ कॉलवर बोलत असे. त्यावेळी सारा सोबत कार्तिक देखील कित्येक तास अमृता सिंग यांच्यासोबत गप्पा मारत असे. काही दिवसांपूर्वी सारा पहिल्यांदाच रॅपवर अवतरली होती. त्यावेळी इब्राहिम आणि कार्तिक दोघे देखील साराचे प्रोत्साहन वाढवण्यासाठी तिथे उपस्थित होते. त्यावेळी कार्तिक आणि इब्राहिम यांची बॉण्डिंग पाहायला मिळाली होती.
काही दिवसांपूर्वी सारा आणि कार्तिक यांचा एक फोटो व्हायरल झाला असून या फोटोत दोघे हातात हात घालून उभे असल्याचे आपल्याला दिसून आले होते. हा फोटो कार्तिक आणि साराच्या चाहत्यांना प्रचंड आवडला असून हा फोटो पाहून त्या दोघांमध्ये मैत्रीपेक्षा अधिक काही तरी असल्याच्या चर्चांना ऊत आले होते. 'लव्ह आज कल २' या चित्रपटाच्या चित्रीकरणानंतर आता कार्तिक त्याच्या ‘पति पत्नी और वो’ या चित्रपटाचे चित्रीकरण करत आहे. या चित्रपटात त्याच्यासोबत भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत असून या चित्रपटाचे चित्रीकरण सध्या लखनऊमध्ये सुरू आहे. सारा या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान कार्तिकला भेटायला लखनऊला गेली होती. त्यांच्या याच भेटीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.